BJP Nitesh Rane : 'त्यांनी 'जय शिवराय' नाही, तर 'अल्ला हू अकबर' म्हणावं'; मंत्री नीतेश राणेंनी जयंतराव अन् कोल्हेंना डिवचलं (VIDEO)

BJP Minister Nitesh Rane Sharad Pawar NCP Party Shivneri Fort Pune : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी शिवनेरी किल्ला येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजप मंत्री नीतेश राणे हिंदुत्वाच्या मुद्यावर सतत आक्रमक असतात. यातून इतरांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील आक्षेप घेताना, तिथं कसं भाजपचं हिंदुत्व पुढं आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न असतो.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फोन उचलल्यावर 'जय शिवराय' बोलावे, असे म्हटले आहे. त्यावर मंत्री राणे यांनी यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला डिवलचलं आहे. त्यांनी 'जय शिवराय' नाही, तर 'अल्ला हू अकबर' म्हणावं, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फोन आल्यावर 'जय शिवराय' बोला, असे म्हटले. त्यावर भाजप मंत्री नीतेश राणे यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर हल्ला चढवला.

Nitesh Rane
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंच्या 'या' शिलेदाराला आमदारकी फिक्स? मुंबई बोलावताच माजी खासदार हिना गावित आक्रमक

भाजप (BJP) मंत्री राणे म्हणाले, "फोन उचलल्यावर 'अल्ला हू अकबर' म्हटलं पाहिजे, 'जय शिवराय' नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंग्याच्या विचारावर चालतो. त्यांनी फोन उचलल्यावर 'जय शिवराय' बोलू नये. फोन आला, तर राँग नंबर म्हणून ठेवायला लागेल. फोन उचलल्यावर 'अल्ला हू अकबर' म्हणा, म्हणजे बरोबर कळले, हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत."

Nitesh Rane
Supriya Sule : "शंभर दिवसात एक विकेट गेली, आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या आंदोलन भाजप मंत्री राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, "आमच्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याची कबर आहे, ती आठवण आम्हाला नको. ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपविले त्याची कबर कशाला? असा प्रश्न केला."

'काहींना ती आठवण वाटते. मात्र ती घाण आम्हाला नको आहे. ज्यांनी कोणाला ती घाण आवडत असेल, तर ती पाकिस्तान किंवा बांगलादेशात घेऊन जावी. अशी कोणतीच चिन्हे नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभे राहील. ती घाण नकोच', अशी ठाम भूमिका मंत्री राणे यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com