BJP spokesperson Naveen Jindal addressing media while criticizing Raj Thackeray and Uddhav Thackeray over their political stand.  sarkarnama
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Alliance : सडकछाप गुंडा, राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या ? विजयी मेळाव्याच्या आधीच भाजपच्या नेत्याची जहरी टीका

Naveen Jindal Criticized Raj Thackeray : उत्तर भारतीय भाजप नेत्यांकडून मराठीच्या विरोधात बोलले जात आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची नावे घेत त्यांना टार्गेट केले जात आहे.

Roshan More

BJP VS MNS : पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीचे दोन जीआर सरकारने रद्द केले. त्याआधी या विरोधात उद्धव ठाकरे-राज ठाकरे मिळून मोठा मोर्चा काढणार होते. मात्र, जीआर रद्द झाल्याने मराठी माणसाचा विजय झाला असे सांगत ठाकरे बंधू आज वरळी येथे विजयी सभा घेत आहेत. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरेंवर भाजप नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे.

दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी पातळी सोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मोर्चाच्या एक दिवस आधीच ट्विट करत ठाकरे बंधू काही कामाचे नसल्याची गरळ जिंदाल याने ओकली आहे. 'दो भाई- जो किसी काम के नहीं', असे ट्विट जिंदाल याने ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या 24 तास आधी केले आहे.

'राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या?' असा प्रश्नही जिंदाल याने ट्विटद्वारे केला आहे. जिंदालची मग्रुरी इतकी की त्याने हे ट्विट पीन करून ठेवले आहे. तसेच राज ठाकरे सारख्या सडकछाप गुंडाची जागा तुरुंगात आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे, असे म्हटले आहे. नवीन जिंदाल हा भाजपचा माजी सोशल मीडिया प्रमुखही आहे.

मुंबईतील उद्योजक सुशील केडीया याने देखील ट्विट करत राज ठाकरेंवर टीका केली होती. 30 वर्ष मुंबईत राहतो. मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा. असे थेट आव्हान केडीयाने राज ठाकरेंना दिले आहे.

राज-उद्धव काय बोलणार?

उत्तर भारतीय भाजप नेत्यांकडून मराठीच्या विरोधात बोलले जात आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची नावे घेत त्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे वरळीमध्ये आज एकत्रित होत असलेल्या ठाकरे बंधुंच्या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार? ठाकरे शैलीत यांचा समाचार घेणार का? याची उत्सुकता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT