BMC Mayor election political battle: Sarkarnama
महाराष्ट्र

BMC Mayor election: ठाकरेसेनेची 'मनसे' खदखद बाहेर; भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार?

BMC Mayor election political battle: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कल्याण-डोंबिवलीत घेतलेल्या निर्णयावरुनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट नाराजी व्यक्त केली आहे.

Mangesh Mahale

Mumbai Mayor Election: महापालिका निवडणुकीनंतर महापौरांची नावे जाहीर झाले आहेत. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला खडेबोल सुनावले आहे. "एका चिन्हावर निवडून यायचे व निकालाची शाई वाळण्याआधीच पक्षांतर करायचे ही वाळवी महाराष्ट्राच्या राजकारणाला लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर तोडगा सांगितला होता तो म्हणजे, ‘फुटलेल्या आमदारांना वगैरे रस्त्यावर तुडवा.’ हे ‘उपाय’ लोकशाहीच्या, कायद्याच्या चौकटीत बसत नसले तरी लोकशाही रक्षणासाठी यापुढे ही तुडवातुडवी करावीच लागेल," असा सूचक इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं अग्रलेखातून दिला आहे.

निवडणुकानंतर विरोधात उभं राहूनही निवडून आलेल्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने दिलेला कौल पाहून ठाकरेसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कल्याण-डोंबिवलीत घेतलेल्या निर्णयावरुनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट नाराजी व्यक्त केली आहे.

सुसंस्कृतपणा

निवडून आलेल्या प्रत्येकाचा सरकारी निधीवर समान अधिकार आहे, पण भाजपने संस्कृतीचे गटार केले व देवेंद्र फडणवीस त्या गटारात पाय सोडून बसले आहेत. त्यामुळे भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार ते स्पष्टच आहे. तरीही सर्वच महापौर मंडळाचे अभिनंदन करण्याचा सुसंस्कृतपणा आम्ही दाखवत आहोत, असा टोला ठाकरेच्या शिवसेनेने लगावला आहे.

निधी कणकवलीच्या पेट्रोल पंपावरून...

‘मी पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देतो. मशाल चिन्ह असेल तर एक रुपयाचा निधी देत नाही,’ असे उघडपणे बोलणारे ‘भंपक’ व टाकाऊ लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. हा निधी ते कणकवलीच्या पेट्रोल पंपावरून आणत नाहीत. जनतेच्या करांतून येणाऱ्या निधींचे वाटप अलोकशाही पद्धतीने करणे हा सरकारी पैशांचा अपहार आहे, असे घणाघात शिवसेनेने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT