Rajasthan Government: सरकारचा मोठा निर्णय! तीन किंवा अधिक मुले असलेल्या व्यक्ती निवडणूक लढवू शकणार

Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma announce: "दोन मुलांच्या अटीमुळे" बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे.
Rajasthan Government NEWS
Rajasthan Government NEWSSarkarnama
Published on
Updated on

दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणाऱ्या तीन दशकांच्या जुन्या कायद्यात राज्य सरकारने बदल करणार आहे. त्यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.

राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकार हा निर्णय घेणार आहे. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे संकेत भजनलाल शर्मा सरकारने दिले आहेत. यामुळे तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकणार आहेत.

भाजपचा आमदारांचा पाठिंबा

राजस्थानमध्ये सुमारे ३० वर्षांपासून हा नियम लागू आहे. "दोन मुलांच्या अटीमुळे" बहुसंख्य पालकांना निवडणूक लढण्यापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती, आता या मागणीची दखल सरकारने घेतली आहे. हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. भाजप आमदारांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे.

Rajasthan Government NEWS
NCP Merger: राष्ट्रवादीसाठी 12 तारीख महत्वाची! विलिनीकरणाबाबत दादांची इच्छा राजकीय की भावनिक होती? रोहित पवार सगळं सांगणार

‘मिशन २०२६’

सध्याच्या सामाजिक व लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत हा नियम अप्रासंगिक ठरत असल्याचे सरकारचे मत आहे. हा निर्णय ‘मिशन २०२६’ चा भाग असल्याचे मानले जात असून, ग्रामीण आणि शहरी राजकारणात व्यापक सामाजिक सहभाग वाढवणे हा यामागील उद्देश आहे, असे उत्तर सरकारच्या वतीने विधानसभेत देण्यात आले.

Rajasthan Government NEWS
Ajit Pawar Plane Crash:अजितदादांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या व्यक्तीची CIDकडून 4 तास चौकशी; आदल्या रात्री काय घडलं?

राजकारणात मोठा बदल

राजस्थानमध्ये पंचायत व नगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आली होती. मात्र आता या नियमामुळे भेदभाव व सामाजिक असमतोल वाढल्याचे आरोप होऊ लागले आहे. हा नियम रद्द झाल्याने राज्याच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com