Nitin Patil, Dhairyasheel Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Rajyasabha Eelection 2024 : भाजपचं राज्यसभेतील बळ वाढलं, महाराष्ट्रातून 2 उमेदवारांची बिनविरोध निवड

Unopposed Election of Dhairyasheel Patil And Nitin Patil to Rajya Sabha : राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीआधीच महाराष्ट्रातील दोन जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध राज्यसभेसाठी निवड झाली आहे.

Jagdish Patil

Rajyasabha Eelection 2024 : राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीआधीच महाराष्ट्रातील दोन जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध राज्यसभेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील दोन्ही जागा आपल्याकडे आणण्यात युतीला यश आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नितीन पाटील (Nitin Patil) आणि भाजपचे धैर्यशील पाटील या दोन्ही महायुतीच्या उमेदारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मात्र, अर्ज पडताळणीमध्ये अपक्षांच्या भरलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या नसल्याचे समोर आल्यामुळे हे उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. तर सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना राज्यसभेवर (Rajya Sabha) नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी साताऱ्यातील वाई येथील सभेत सातारच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार विजयी आल्यास नितीन पाटलांना खासदार करणार, असा शब्द दिला होता. तर राज्यसभेची निवडणुक जाहीर होताच पाटील यांच्या उमेदवारीसाठी दादांनी डाव टाकला आणि त्यांना तिकीट दिले. आता त्यांची बिनविरोध निवड झाल्यानी दादांनी दिलेला शब्द पाळल्याची चर्चा साताऱ्यासह राज्यात सुरु आहे.

नितीन पाटील हे वाई-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तसेच ते सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. तर धैर्यशील पाटील हे माजी आमदार आहेत. तसेच ते सध्या रायगड जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी देखील रायगड, रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. तेंव्हा संधी मिळाली नाही पण आता त्यांची भाजपकडून राज्यसभेवर वर्णी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT