Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मोठं गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. त्यामुळे आता दादा आपल्या लाडक्या बहिणींना दिलेला वादा लवकरच पूर्ण करणार असल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. पावसाळी अधिवेशनात अजित पवारांनी (Ajit Pawar) या योजनेची घोषणा केल्यापासून अर्ज करण्यासाठी महिलांची धावपळ सुरु झाली आहे.
सुरुवातीला सरकारने ही योजना विधानसभेची निवडणूक (Assembly Election) डोळ्यांसमोर ठेवून सुरु केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र महिलांचा उत्साह पाहता सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना अर्ज भरुन देण्यासाठी विविध केंद्र उभारल्याचं पाहायला मिळालं.
सरकार आणि विरोधकांमध्ये या योजनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरी महिलांनी मात्र या योजनेचे अर्ज भरायला सुरुवात केली आहे. शिवाय अर्ज कधीही भरला तरी महिलांना योजनेची घोषणा झाल्यापासूनचे सर्व पैसे मिळणार असल्याचंही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच या योजनेची मुदत देखील वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या योजनेचे पैसे कधी मिळणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील आता अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजितदादांनी दिली आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्याची रक्कम एकत्र रक्षाबंधनाला मिळणार आहे. त्यामुळे आता महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशीच मोठं गिफ्ट देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.