Devendra Fadnavis And Ajit Pawar : मोठी बातमी! राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्...

Devendra Fadnavis and Ajit Pawar News : नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis and Ajit Pawars helicopter News : नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

या हेलिकॅाप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील उपस्थित होते. हेलिकॅाप्टर पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar) आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Assembly Election 2024 : विधानसभेला उद्धव ठाकरेंकडे 288 उमेदवार तरी आहेत का?

मात्र, हेलिकॅाप्टर ढगात भरकल्यानंतर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली आहे. शिवाय आता सर्वजण सुखरुप आहेत. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर भरकटल्याची बातमी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com