Budget 2025 Announcement Sarkarnama
महाराष्ट्र

Budget 2025 Announcement : मोदींनी काय काय स्वस्त केलं; कॅन्सर औषधांपासून ते मोबाईलपर्यंत...

Budget 2025 Union Finance Minister Nirmala Sitharaman drugs cancer mobile electronics vehicles : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना औषधांपासून अनेक गोष्टी स्वस्त केल्या आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. नोकरदारांना करांमध्ये दिलासा देताना अनेक गोष्टी स्वस्त होणार असल्याची घोषणा केली.

वैद्यकीय उपचारांचे आव्हान ओळखून वैद्यकीय उपकरणं, कॅन्सरवरील औषधं, मोबाईलसह इलेक्ट्राॅनिक्स वाहनं स्वस्त होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.

मोबाईल आणि मोबाईलचे पार्ट, बॅटरी, टीव्ही, एलईडी, एलसीडी भारतात बनवलेले कपडे, इलेक्टाॅनिक (Electronic) वाहन, चामड्यांच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. भारतातील वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. देशात हवेतील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, याशिवाय इंधन दरवाढीचे देखील दिव्य आहे. यामुळे इलेक्ट्राॅनिक्स वाहनांना चालना देण्यासाठी त्यांच्या किमतीचा कमी करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून मोदी सरकारने मांडला आहे.

जागतिकरणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. कोरोनानंतर अनेकांना वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळाले आहे. यात विशेष करून कॅन्सरसारख्या आजारांवर मात करताना सर्वसामान्यांना आर्थिक बजेट कोलमडून जाते. हे लक्षात घेऊन मोदी (Narendra Modi) सरकारने वैद्यकीय उपकरणांबरोबर कॅन्सरवर उपचारासाठी आवश्यक असलेली आणि इतर 36 औषधे स्वस्त करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात मांडला आहे. या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे. यामुळे ही औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील.

आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर

ऑनलाईन गिग वर्कर्सकडून पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवली जाईल. 1 कोटी गिग वर्कर्सला याचा फायदा होणार आहे. पुढील पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 हजार जागा वाढवल्या जाणार आहे. सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रमातून 8 कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे. तसेच अटल टिंकरिंग लॅब 50 लाख पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील.

करांमधून येणाऱ्या उत्पन्नावर किती बोजा पडणार

या करांमधून येणाऱ्या उत्पन्नावर 1 लाख कोटी, तर अप्रत्यक्ष करांमधून येणाऱ्या उत्पन्नावर 2600 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. करदात्यांचे 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार उत्पन्न 12 लाख रुपये असेल, तर त्याला 80 हजार रुपयांची करात सूट मिळेल. म्हणजेच 100 टक्के कर माफ होईल. एखाद्याचं उत्पन्न 18 लाख असेल, तर त्याला 70 हजारांचा फायदा होईल. त्याचा 30 टक्के कर कमी होईल. 25 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा 1 लाख 25 हजारांचा कर कमी होईल, म्हणजेच त्याला 25 टक्के कर कमी भरावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT