CM Devendra Fadnavis 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या नावे विरोधकांना फडणवीसांनी का मारला टोला?

Budget 2025 session Maharashtra CM Devendra Fadnavis opposition final week proposal legislative assembly : अर्थसंकल्पीय 2025 अधिवेशनात विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.

Pradeep Pendhare

Maharashtra Assembly : कायदा आणि सु्व्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देताना, विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली.

"विरोधी पक्षांनी विरोधकांच्या भूमिकेत जाण्याची गरज आहे. त्यासाठी पक्ष अभिनिवेश विसरून विरोधकांना प्रशिक्षण देण्यास तयार आहे. गरज पडल्यास छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही मदतीला पाठवतो", असा टोला फडणवीसांना विरोधकांना लगावला.

राज्यातील शांतता-सुव्यवस्थेवरून विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले होते. राजकीय गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घरले. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकरराव कोकाटे यांच्यावर देखील आरोप झाले. विरोधकांनी थेट यांच्या मंत्रिपदाची राजीनामा लावून धरली आहे.

बीडमधील संतोष देशमुख हत्या, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू, पुण्यातील स्वारगेट प्रकरणाबरोबर सायबर, अंमली पदार्थांची तस्कारी, वाळू चोरी यातून वाढलेल्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. राज्यातील शांतता-सुव्यवस्थेवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देताना विरोधकांना चांगलेच सुनावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रस्तावात नवीन कोणताच मुद्दा नसल्याने आता विरोधी पक्षांनी विरोधकांच्या भूमिकेत जाण्याची गरज आहे. त्यासाठी अभिनिवेश विसरून विरोधकांना प्रशिक्षण देण्यास तयार आहे. गरज पडल्यास छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही मदतीला पाठवतो".

महायुतीमध्ये समन्वय

भुजबळ आणि मुनगंटीवार यांना मदतीला पाठवण्याबरोबरच, महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याचा आवर्जुन सांगितले. आम्ही तिघांमघ्ये चांगला समन्वय आहे. कितीही भांडणे लावण्याचा प्रयत्न करता, तरी आम्ही एकत्र आहोत, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी एका दगडात....

विरोधकांना टोला मारताना भुजबळ आणि मुनगंटीवार यांचे नाव घेतल्याने त्यावरून महायुतीत या नेत्यांच्या भूमिकेविषयी चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ अन् मुनगंटीवार यांनी या अधिवेशनात बऱ्यापैकी विरोधकाची भूमिका बजावली. त्यामुळे विरोधकांबरोबर या दोघा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावून एका दगडात दोन-तीन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT