Walmik Karad News : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण 14 कलामांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सुशील कराडसह अनिल मुंडे, गोपी गंजेवर यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराने पिडीत महिला आणि तिच्या पतीसह मुलीला घरात घुसून धमकी देत मारहाण केली. तसेच त्यांच्या नावावरील प्लॉट, सोने धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतले.
याशिवाय पीडितेच्या दोन 6 वाहने देखील स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार 2024 साली घडला असून पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय.
फिर्यादी महिला सन २०२१ पासून 'आराध्या ट्रान्सपोर्ट' नावाने व्यवसाय करत असून त्यांच्याकडे बळकर ट्रक व चारचाकी गाड्या आहेत. तसेच त्यांनी परळी वैजनाथ नगर परिषद क्षेत्रातील मौजे जलालपूर येथील जमीन खरेदी केली होती. फिर्यादीचे पती सुशिल कराड यांच्याकडे तीन ते साडेतीन वर्षे मार्केटिंग मॅनेजर व कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामास होते.
आरोपी सुशिल कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजवेर यांनी फिर्यादीच्या पतीला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बंद करण्याची धमकी देत वारंवार मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या मालकीच्या गाड्या आणि जमीन बळकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अर्ज करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. अखेर पिडीतेने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथे धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि वकीलांच्या मार्फत पोलिसांना तक्रार नोंदवण्याचे निर्देश मिळाल्यानंतर अखेर सुशिल कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजवेर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परळी परिसरात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.