CBSE बोर्डाने सहावीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांना द्विस्तरीय रचना लागू करण्यात येणार आहे.
या बदलांमुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिक आणि समजण्यास सोपी शिक्षण पद्धती मिळणार आहे.
Mumbai News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मोठा निर्णय घेत नवीन शिक्षणक्रमही जाहीर केला आहे. या निर्णयानुसार पुढील वर्षी पासून इयत्ता सहावी वर्गासाठी तीन भाषा विषय सक्तीचे करण्यात आले असून तीन पैकी दोन भारतीय भाषा असतील. तसेच बोर्डाने इयत्ता नववी पासून गणित आणि विज्ञानामध्ये द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता तीन भाषांमध्ये दोन भारतीय आणि तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक भाषा निवडावी लागणार आहे.
बोर्डाने घेतलेला निर्णय पुढील वर्षीपासून लागू होणार असून इयत्ता सहावीपासून बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा नियम लागू होईल. पण परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू नसेल. तर मंडळाने पुढील वर्षीपासूनच गणित आणि विज्ञानासाठी द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे.
ज्यामध्ये नेहमीच्या ऐंशी गुणांच्या परीक्षा व्यतिरिक्त आणखी एक पर्याय दिला जाईल. जी परीक्षा 25 गुणांची संबंधित विषयाच्या आकलन क्षमतेवर असेल. तर हे गुण एकूण गुणात न घालता त्याची नोंद गुणपत्रिकेवर वेगळी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत, मोर्डाच्या अनेक शाळांमध्ये केवळ दोन भाषा अनिवार्य केल्या होत्या. पण आता नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकावी लागणार आहे. यामुळे अभ्यासाची व्याप्ती वाढणार असून विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकण्यासह ती समजून घ्यावी लागणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने 'इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्ड' अशी आकर्षक नाव देऊन पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या बोगस शाळांना दणका दिला आहे. अशा नावांबाबत सरकारने नवी नियमावली बनवली आहे.
तर नवीन शाळा सुरू करताना आता सर्रास असे शब्द वापरता येणार नाहीत. तसेच दर्जावाढसाठी अर्ज करताना विद्यमान शाळांचीही छानणी होणार आहे. तसेच या शाळांमध्येही बोगस प्रकार आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
Q1. CBSE चा नवीन अभ्यासक्रम कधी लागू होणार?
👉 नवीन अभ्यासक्रम 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू होण्याची शक्यता आहे.
Q2. तीन भाषा नियम कोणत्या वर्गापासून लागू आहे?
👉 सहावी इयत्तेपासून तीन भाषा शिकवण्याचा नियम लागू होणार आहे.
Q3. गणित आणि विज्ञानात काय बदल झाले आहेत?
👉 नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांना द्विस्तरीय स्तर देण्यात येणार आहे.
Q4. या बदलांचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?
👉 विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विषय निवडण्याची संधी मिळेल.
Q5. हा बदल सर्व CBSE शाळांसाठी लागू आहे का?
👉 होय, CBSE अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये हे बदल लागू होतील.