Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

CJP News : मोदी सरकारला झुकवले... जल्लोष होणार तर होणार! शिवाजी पार्कच्या मोर्चाबाबत ठाकरे बंधूंची मोठी घोषणा

Shivaji Park rally News : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनामा की खातेबदल करण्यात येणार हे सरकारकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

Sachin Waghmare

Mumbai News : देशात अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. युवकांनी देशाला भयाच्या छायातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनामा की खातेबदल करण्यात येणार हे सरकारकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. त्यासोबतच सीजेपीच्या दोन मागण्या बाकी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे रविवारी तरुणाईचे अभिनंदन करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

दिल्लीतील सीजीपीचे आंदोलन करीत देशभरातील युवक मोठ्या प्रमाणांत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवले आहे. त्यामुळे या युवकाचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. त्यासाठी रविवारी काढण्यात येणारा मोर्चा पूर्वी ठरल्या प्रमाणेच काढण्यात येणार असल्याचे मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्या शिवाजी पार्कवरून तरुणाईचा विजय मोर्चा निघणार आहे. देशभरातील युवकांनी देशाला भयाच्या छायातून बाहेर काढले आहे.

अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन करतो. एका झुरळाने हुकूमशाहला जेरीस आणले आहे. सीजेपीच्या दोन मागण्या बाकी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे. अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा करून यतेय काळातील रणनीती ठरविणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्याच्या मोर्चासाठी शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचं तर जेनझीने केंद्र सरकारला पूर्णपणे जमिनीवर आणले आहे. मला वाटतं हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे. त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवाल उत्तरे देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं, त्याचा जल्लोष झाला पाहिजे असे राज ठाकरे यांनी नमूद केले.

त्यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खोचक टीका करतानाच सरकारवर टीकास्त्र सोडलं. ‘ जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य करत सरकारला सणसणीत टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT