Raj Thackerey News: नीट पेपरफुटीच्या विरोधातील नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनासाठी उद्या (ता.२६) मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा होत आहे. या मोर्चाबाबत नाशिकच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक युवकांनी त्यात सहभागी होण्याची तयारी केली आहे.
नवी दिल्लीतील काही वादग्रस्त घटना तसेच मोर्चात गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही असामाजिक तत्त्वांनी केला होता. त्यामुळे उद्याच्या मुंबईतील मोर्चाबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सावध केले आहे. त्यांनी याबाबत वेगळीच सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.
राज ठाकरे म्हणतात, परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण 'तिरंगा मार्च' काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आले आहे.
हा 'तिरंगा मार्च' हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत. विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत. त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत, त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे.
आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या.
नाशिक शहरातील कॉलेज रोडवर शुक्रवारी सायंकाळी युवकांनी टॉर्च मोर्चा काढला. या मोर्चाला अनपेक्षीत गर्दी झाली. मोठी गर्दी झाल्याने आयोजक अन् पोलीसही चक्रावले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोर्चाला जाण्यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांना हुरूप आला आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरू आहे.
यासंदर्भात नाशिक शहरातील नागरिकांन या मोर्चाविषयी मोठी उत्सुकता आहे. अनेक बिगरराजकीय कार्यकर्ते, नागरिक संपर्क साधत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला येण्याची तयारी करीत आहेत, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसवेक सलीम शेख यांनी सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.