Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News : मनोज जरांगेंचे आंदोलन, पण बावनकुळे म्हणतात, आरक्षणाचा मार्ग...

संपत देवगिरे ः सरकारनामा

BJP On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी रॅली काढत सभा घेतली. रविवारी त्यांनी आरक्षणासाठी दिलेली मुदत देखील संपली. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत मराठा आरक्षणाबाबत मोठा विजय झाल्याचे सांगत देवेद्र फडणवीस यांचा ट्विटमध्ये उल्लेख केला.

मनोज जरांगे यांची बीडमध्ये रॅली सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार असल्याचे जाहीर झाले. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महायुती सरकारने भक्कमपणे सर्वोच्च न्यायलायत बाजू मांडल्यामुळे कायदेशीर मराठा आरक्षण मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेले मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला, असे ट्विट केले.

मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाबाबत आणखी मुदतवाढ देण्यास तयार नाहीत. त्यांनी या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव मुंबईत दाखल होणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे काही मंत्री सतत जरांगे पाटील यांच्या संपर्कात असून त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हे ट्विट केले आहे.

बावनकुळे यांनी ‘महायुती सरकारचा मोठा विजय’ असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेले मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज महायुती सरकारचा मोठा विजय झाला असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबुतीने मांडेल आणि मराठा समाजाला न्याय देईल ही खात्री आहे. ‘जय जिजाऊ- जय शिवराय’, असे ही बावनकुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT