Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये, 2034 पर्यंत फडणवीसच....', चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले

Chandrashekhar Bawankule On CM Speculation : देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. या दावा बावनकुळे यांनी कोढून काढला आहे.

Roshan More

Chandrashekhar Bawankule News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांवर बावनकुळे यांनी मौन सोडले आहे.

बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की, 'सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन, म्हणावे लागेल.'

'सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस हे 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे.', असे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये, असे देखील म्हटले आहे.

संजय राऊतांचा दावा काय?

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री झाले तर चंद्रेशखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील. त्यांचा सर्वांसोबत समन्वय चांगला आहे. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातात बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करतील.

आम्हाला माहीत नाही...

छगन भुजबळ यांना पत्रकारांनी संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, त्यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे याबाबत मला काही माहिती नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT