Omar Abdullah BJP Allegation : '30 कोटी, मंत्रिपद अन् राज्याचा दर्जा'; भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांचा दाव्यानं खळबळ

Omar Abdullah alleges BJP offered ₹30 crore, ministerial post National Conference MLA : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भाजपवर नॅशनल कॉन्फरन्सचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Omar Abdullah BJP Allegation
Omar Abdullah BJP AllegationSarkarnama
Published on
Updated on

Jammu Kashmir Politics : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी भाजपवर त्यांच्या पक्षातील आमदाराला फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

जम्मूमधील एका आमदाराला 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा त्यांनी एका जाहीर सभेत केला.

उमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजपने (BJP) 'मागच्या दाराने' सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित आमदाराने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी केला. पैशांचे आमिष आणि राजकीय प्रलोभने दाखवूनही आमदाराने पक्षाशी निष्ठा कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

"भाजपने आमच्या जम्मूतील (Jammu Kashmir) आमदाराला 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत, कारण ते आम्हाला किंवा आमच्या प्रतिनिधींना विकत घेऊ शकत नाहीत," असे उमर अब्दुल्ला यांनी सभेत म्हटले.

Omar Abdullah BJP Allegation
Ram Mandir CEO : राम मंदिर ट्रस्टच्या CEO पदावर महिला अधिकाऱ्याची नियुक्तीची चर्चा; कथित देणगी चोरीप्रकरणानंतर प्रशासकीय बदलांच्या हालचालींना वेग

यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही उल्लेख केला. "जम्मू-काश्मीरच्या जनतेने भाजपला सरकारपासून दूर ठेवले आहे. जनतेने नाकारल्यानंतर मागच्या दाराने सत्तेत येण्याचा प्रयत्न होत आहे," असा आरोपही त्यांनी केला.

Omar Abdullah BJP Allegation
Hotel Owner Murder : श्रीरामपूर हादरलं! जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

उमर अब्दुल्ला यांच्या या आरोपांमुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर भाजप काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com