Chhagan Bhujbal Manoj Jarange patil Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Video Chhagan Bhujbal : 'जरांगे निघून गेला होता, शरद पवारांच्या आमदारांनी त्याला परत आणला', भुजबळांचा खळबळजनक दावा

Chhagan Bhujbal Manoj Jarange patil Rohit Pawar : छगन भुजबळ यांच्या आधी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील जरांगे पाटील यांचे आंदोलन आमदार रोहित पवार यांनी मॅनेज केल्याचा आरोप केला होता.

Roshan More

Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी मनोज जरांगे निघून गेला होता. पण शरद पवार गटातील दोन आमदारांनी त्याला परत आणून बसवला, असा दावा भुजबल यांनी केला आहे.

अंतरवालीत दगडफेक झाली लाठीमार झाला. त्यावेळी जरांगे निघून गेला होता. एक स्थानिक आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी यांनी त्याला तेथे आणून बसवला, असे भुजबळ म्हणाले.

'पवारसाहेबांना त्यांनी तिकडे नेलं, उद्धव ठाकरे यांना तेथे नेलं. या दोघांना याची कल्पना नव्हती पोलिसांवर दगडफेक झाली आहे. 80 पोलिस जखमी झाले आहेत. त्यामध्ये महिला पोलिस देखील होत्या. ते रुग्णालयात अ‍ॅडमीट झाले होते. स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला केला.', असे देखील भुजबळ म्हणाले.

दोन्ही नेते तेथे गेले. एकच बाजू जनतेच्या पुढे आली. त्याचा फायदा मनोज जरांगेंना झाला, याच्या मागे त्या दोघांचा हात (राजेश टोपे, रोहित पवार) आहे, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या आधी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील जरांगे पाटील यांचे आंदोलन आमदार रोहित पवार यांनी मॅनेज केल्याचा आरोप केला होता.

राजेंद्र राऊतांचे आरोप काय ?

मनोज जरांगे पाटील यांचा सगळा सोशल मीडिया हा रोहित पवारांकडून चालवला जातो. जालना हे केंद्रबिंदू असून परभणी, हिंगोली बीडमधून काम चालू आहे. या कटकारस्थानामागे आमदार रोहित पवार असल्याचा संशय येतोय. जरांगे पाटील आणि रोहित पवार यांच्यात संबंध असल्याचा आहेत, असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT