Ambadas Danve Vs Girish Mahajan : 'भाजपच्या बुडाखाली जाळ, त्यामुळं महाजन पळतायत'; अंबादास दानवेंची झोंबणारी टीका

Shiv Senas Ambadas Danve criticizes BJP over minister Girish Mahajans two-wheeler video : भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या दुचाकीवरून व्हिडिओवर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी टायमिंग साधत केली टीका.
Ambadas Danve Vs Girish Mahajan
Ambadas Danve Vs Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील जामनेर मतदार संघातील खराब रस्त्याच्या मुद्यावर पळ काढणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही स्थानिक युवकांनी त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढल्याचा दावा केला जात आहे.

यावर शिवसेना नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते गिरीश महाजन यांच्या या व्हिडिओवर टायमिंग साधत, 'भाजपच्या बुडाखाली किती जाळ लागला आहे, त्याचं प्रतिनिधीत्व करणारा हा व्हिडिओ आहे', असा टोला लगावला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांची भाजपमध्ये नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास म्हणून ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातून ते भाजपचे प्रतिनिधीत्व करतात. याच मतदार संघातील एका गावात तु खराब रस्त्यावरून दुचाकीवरून जाताना दिसत आहे. दुचाकीवरून जात असताना त्यांना काही तरुणांनी खराब रस्त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी दुचाकी जोरात नेल्याचा दावा होत आहे. त्यावर आता विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

Ambadas Danve Vs Girish Mahajan
Eknath Shinde : निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सरकारनं चालवलं 'मराठी कार्ड'

शिवसेनेचे (Shiv Sena) नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गिरीश महाजन पळून जात आहेत, असे भाजपला काही दिवसांनी पळून जावे लागेल. आता त्यांच्या बुडाखाली काय जळते, हे पाहावं लागणार आहे. भाजपमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी गुंतला असून, गिरीश महाजनांवर मोठी जबाबदारी आहे. यातच, त्यांचा दुचाकीवरील असा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं विरोधकांना चर्चेला आणि टीकेला संधी मिळाली आहे.

Ambadas Danve Vs Girish Mahajan
Shivsena News : "बाहेर वावरताना स्वत:चा धर्म..."; बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर यामिनी जाधवांचं स्पष्टीकरण

'हराम'ची कमाई उधळली

ठाण्यातील दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या 'आनंदाश्रम'मध्ये नोटा उधळण्याच्या प्रकारावर शिवसैनिकांमध्ये संताप उसळला आहे. अंबादास दानवे यांनी यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटावर टीका केली. 'आनंद दिघे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल, तिथं हरामची कमाई उधळली जात असेल. दिघेंचा आदर्श घ्यायला हवा. तिथं बाजार मांडलाय', असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

भाजपचा खड्डाच होणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावर देखील दानवे यांनी टीका करत, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह येऊन गेले आहेत. ते पुन्हा येतील. कितीही फौजा घेऊन या, नड्डा आणि भाजपचा, खड्डाच होणार, हे निश्चित आहे', असा टोला लगावला. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नीतेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे बिन भरवशाची माणसं असल्याचं म्हणत, केंद्रातील मोदी सरकार कधीही कोसळेल, असं विधान केलं होते. त्यावर अंबादास दानवे यांनी योग्य तेच बोलले असल्याचं सांगत शिक्कामोर्तब केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com