Minister Chhagan Bhujbal  Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : 'मराठ्यांना 750 कोटी, ओबीसींना फक्त पाच कोटी', छगन भुजबळांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'दुजाभाव...'

Chhagan Bhujbal OBC Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दावा करत सरकार मराठे आणि ओबीसींमध्ये दुजाभाव करत असल्याचा दावा केला आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal News : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्याचे टाळणारे मंत्री छगन भुजबळ आता अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. जरांगे पाटील यांनी शिव्या देतात तरी देखील मंत्री त्यांना भेटायला जातात, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी निधीच्या बाबतीत ओबीसी समाजावर कसा अन्याय होतोय, हे सांगितले.

ते म्हणाले, राज्य शासनाकडून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करताना देखील दुजाभाव झाला आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मराठा समाजासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्या तुलनेत ओबीसी घटकांसाठी मात्र राज्य शासनाने हात आखडता घेतला. केवळ पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

ती जशी लेकरंबाळं आहेत, तशी या ओबीसी, दलित, आदिवासी समाजात देखील लेकरंबाळं आहेतना, त्या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. कोणीतरी प्रेशर आणतंय म्हणून तुम्ही करताय, जर योग्य असेल तर तुम्ही करना पण ओबीसीच्या मुळावर येत असेल तर हा छगन भुजबळ रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील त्यांनी दिला.

राज्य शासनाने यासंदर्भात दुजाभाव करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास सहन केले जाणार नाही. त्या विरोधात मैदानात उतरेल असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

शासनाने निधीचा विनियोग करताना खबरदारी घेतली पाहिजे. ओबीसी घटकांवर अन्याय होता कामा नये. या संदर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT