Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या भूमिकेत मोठा बदल; म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील आमच्या विरोधात नाही...'

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे. जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Chhagan Bhujbal Jarange Patil controversy
Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत.तर, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके मुंबईत एक सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त केली जात असताना मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची जरांगे पाटलांविषयी भूमिका बदली असल्याची चर्चा आहे.

छगन भुजबळ म्हणाले, 'मनोज जरांगेचा लढा हा आमच्या विरोधात नाही. त्याचा लढा शासनाच्या विरोधात आहे.जात पडताळणी रद्द का होतोय? असा सवाल आहे. त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन आ बैल मुझे मार असं म्हणण्याचे काय कारण आहे.'

'आम्ही भेटल्यानंतर आमच्या गोष्टी होतात शांततेने, त्या गोष्टी आम्ही शांततेने करू.', असे देखील ते म्हणाले.

लक्ष्मण हाके हे ओबीसींचे आरक्षण संपल्याचा दावा करत आहेत.मराठ्यांची ओबीसी आरक्षणात घुसखेरी केली असल्याचेही त्यांनी म्हटले. याबाबत पत्रकारांनी भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले,'कोणी सांगितलं ओबीसींचं आरक्षण संपलंय? ओबीसींची आरक्षण काही संपलेलं नाही, काही जाती जमाती मागणी करत आहेत की आम्हला ओबीसीमध्ये घ्या. म्हणून त्यामध्ये देखील जात गणनेमध्ये, पडताळणीमध्ये पास होतात. जे चुकीचे आहेत ते नापास होतात. त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं आहे म्हणून.'

Chhagan Bhujbal Jarange Patil controversy
Chhagan Bhujbal : भुजबळांनी जरांगेंना अंगावर घेणं टाळलं; म्हणाले, ‘आ बैल मुझे मार’ म्हणण्याची गरज नाही

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांसह परिषदेचे विविध नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणने विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या यांच्या अभिनंदनचा ठराव देखील बैठकीत करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी मराठा सेवकांची बैठक आंतरवाली सराटीमध्ये घेतली. या बैठकीत माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला त्यांनी इशारा देखील दिला. तसेच कुणबी प्रमाणपत्रांसाठी सरकारवर दबाव वाढवण्याची रणनीती ठरवण्यात आली.आंदोलकांसाठी लागणाऱ्या सुविधांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.

Chhagan Bhujbal Jarange Patil controversy
Chhagan Bhujbal : म्हणून सगळेजण शरद पवारांना रेड कार्पेट टाकतात, NDA मध्ये जाण्याच्या चर्चेवर मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com