Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आधीच भुजबळांना मूळ गुन्ह्यातून दोषमुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, जर मूळ गुन्हा रद्द झाला, तर ईडीचा खटलाही चालू शकत नाही. याच तांत्रिक मुद्द्यावर भुजबळांचा अर्ज मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे, एसीबीकडून आधीच या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीकडून देखील छगन भुजबळ यांना क्लिनचीट देण्यात आली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथीत घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण 14 जणांची नावं होती.
हा कथीत घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं, या प्रकरणात आरोप झाल्यानं छगन भुजबळ चांगले अडचणीत आले, ते दोन वर्ष तुरुंगात देखील होते. मात्र त्यानंतर त्यांना या प्रकरणात आधी एसीबीकडून दोष मुक्त करण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना ईडीने देखील दिलासा दिला आहे. ईडीकडून देखील आता छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि इतरांकडून ईडीकडे निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता, तो आता ईडीने मंजूर केला आहे. भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
त्यासोबतच या प्रकरणातील इतर आरोपींनाही दिलासा मिळला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांनाही यापूर्वीच विविध तांत्रिक प्रक्रियांमधून दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "सत्याचा विजय उशिरा का होईना, पण झालाच. आमच्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीने आरोप केले गेले होते, हे आता सिद्ध झाले आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.