BMC Mayor BJP : मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार? एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेणार का? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai Mayor: Sanjay Raut reacts to BJP claim with Eknath Shinde Shiv Sena support ShivsenaUBT : मुंबई महापौर पदावर कोण बसणार आणि एकनाथ शिंदेचा पाठिंबा घेणार का, यावर खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
Sanjay Raut reacts
Sanjay Raut reactsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Corporation Mayor : मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा बसणार, यावर भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीत घमासान सुरू आहे. महापौर पदी संधी मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपवर चांगलाच दबाव आणला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांनी, कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे फुटलेले नगरसेवक घेऊन राजकीय प्रयोग देखील करत, सत्तेच्या चाव्या जवळपास खिशात घातल्या आहेत.

परंतु, मुंबईत महापालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा घेणार का, तिथं कोणाचा महापौर बसणार यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट विधान केलं आहे.

संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत महापौर पदाची भाजपला संधी सोडणार नाही, हे निश्चित आहे. मुंबई शिवसेनेचा महापौर बसावा यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा पाठिंबा घेणार का? यावर संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर देताना, अजिबात नाही, असे सांगून टाकले.

मसंजय राऊत म्हणाले, "बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत, त्यांच्याबरोबर आता फोटो शेअर, हिंदुत्वाची (Hindutva) ऊर्जा मिळाली, असे म्हणत आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे." पण, बाळासाहेबांना आदरांजली वाहिलीच पाहिजे. अनेक मान्यवरांनी तशी वाहिली आहे. पण याच भाजपने शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट यांची शिवसेना फोडली. यानंतर शिवसेनाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना पदावर बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा घेणार का या सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut reacts
OBC Mayor : भाजप-राष्ट्रवादीची सत्ता, पण शांतता नाही! ‘मूळ ओबीसी vs कुणबी’ने महापौरपदावर रण पेटलं

मुंबईत शिवसेनेचा महापौर बसायचा असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी, "यावर सर्व काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो पक्ष घेईल. पण भाजप कोणत्याही परिस्थिती महापौरपद सोडणार नाहीत. ते शिवसेनाप्रमुखांचे फोटो राजकीय स्वार्थासाठी वापरतात. पण याच भाजपचे शिवसेनाप्रमुखांचा पक्ष फोडला आणि शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तीच्या हाती ठेवलात."

Sanjay Raut reacts
Mayor No Confidence Motion : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणायचा आहे, तर हे नियम जाणून घ्या...

बाळासाहेबांच्या शब्दांची राऊतांनी करून दिली आठवण

शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही, यावर पक्ष निर्णय घेईल, या प्रश्नावर संजय राऊत यांनी, "शिंदेंचा पाठिंबा अजिबात घेणार नाही, असे स्पष्ट केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत. सत्ता मिळत नाही, म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही कळवळत नाही." भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे. ती सर्वांना दिसते आहे. पैशांचा वापर करून, निवडणुका जिंकल्या आहेत. बाळासाहेब यावर म्हणायचे, यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या आहेत. हा बाळासाहेबांचा शब्द आहे, अन् तो रेकाॅर्डवर आहे, याची आठवणही राऊत यांनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com