helicpoter incident  Sarkarnama
महाराष्ट्र

helicopter incident : हेलिकाॅप्टर लँड करताना मोठी चूक, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता थोडक्यात बचावला!

Political News : हेलिकाॅप्टर लँड करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी दुपारी साडे-बाराच्या सुमारास घडली.

सरकारनामा ब्युरो

Pune News : बारामतीनजीकच्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. ही घटना होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला असतानाच आता आणखीन एक घटना समोर आली आहे. हेलिकाॅप्टर लँड करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी दुपारी साडे-बाराच्या सुमारास घडली. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून पुण्याला जाताना ही घटना घडली. या अपघातातून मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले आहेत.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे हेलिकॉप्टर लँड करताना मोठी चूक झाल्याचे घटना पुढे आली आहे. नाशिकहून पुण्याला जात असताना ही घटना घडली. भुजबळ यांचे हेलिकॉप्टर चुकून पार्किंगमध्ये लँड करण्यात आले. या अपघातातून भुजबळ थोडक्यात बचावले आहेत. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भुजबळ आले होते.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भुजबळ पुण्याला निघाले होते. मात्र, हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी गाड्यांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवण्यात आले. पायलटकडून घडलेल्या या मोठ्या चुकीमुळे एक मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत छगन भुजबळ यांच्यासह इतर कोणालाही इजा झाली नाही.

भुजबळ हे हेलिकॉप्टरने पुण्याकडे निघाले असताना पुण्यातील नियोजित लँडिंग स्पॉटवर (हेलिपॅड) उतरण्याऐवजी जवळील गाड्यांच्या पार्किंगमध्ये लँडिंग केले. हेलिकॉप्टरचे रोटर्स फिरत असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना धक्का बसण्याची भीती निर्माण झाली होती.

पायलटने केलेल्या या गंभीर चुकीमुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्यात आले, पण संपूर्ण घटना धोकादायक ठरली. मंत्री भुजबळ यांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, छगन भुजबळ हे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या प्रवासातील ही अनपेक्षित घटना चर्चेचा विषय बनली आहे. सध्या या प्रकरणी हेलिकॉप्टर पायलट आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पायलटच्या या चुकीमागे तांत्रिक कारण होते की मानवी चूक, याचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT