Chhagan Bhujbal  Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Video : हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका फेटाळताच छगन भुजबळ कडाडले, 'खोटा समज पसरतोय...'; 'प्लॅन बी' देखील सांगून टाकला

Chhagan Bhujbal Court Hyderabad Gazette GR : हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर रद्द करण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना रीट याचिकांचा संदर्भ दिला आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal News: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला होता. त्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणारे याकडे मराठा, ओबीसी आंदोलकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अॅड विनीत छोत्रे यांनी दाखल केलेली ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ओबीसी आंदोलकांना हा मोठा धक्का मानला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, 'पीएल (जनहित याचिका) नको रीट दाखल करा, असे आम्ही सांगत होतो. आता त्यामुळे चुकीचा गैरसमज पसरतो आहे. पीएल करणाऱ्याने आम्ही रीट करू असे सांगितले. त्यावेळी कोर्टाने आता आम्ही तुमची पीएल फेटाळतो असे सांगितले.' तसेच रीट याचिकेच्या माध्यमातून न्याय मिळेल हा प्लॅन बी देखील सांगून टाकला.

ते म्हणाले, 'आम्ही चार ते पाच रीट दाखल केल्या आहेत. कुणबी सेना, नाभिक समाज,माळी महासंघ आणि समता परिषदेच्या अधिकारी मांडलिक यांच्यावतीने रीट दाखल केल्या आङेत. त्याची सुनावणी सुरू होईल. अतिशय काळजीपूर्वक वकील आपण नेमले आहे. मला खात्री आहे त्यात निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.',

आपली मागणी आहे जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा, असे सांगत भुजबळ म्हणाले, आरक्षणाचा पाया सामाजिक मागासलेपणावर आहे. आर्थिक विषमतेवर नाही. ओबीसी जात नाही अनेक जातींचा समूह आहे.

रीट याचिका म्हणजे काय?

भारतीय संविधानातील तरदुतीनुसार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे. मुलभूत अधिकाराचा भंग झाला असेल तसेच न्याय मिळत नसेल तर ही याचिका करता येते. या याचिकेत पाच प्रकार असून हैद्राबाद गॅझेट जीआर प्रकरणात मॅन्डेमस प्रकारातील रीट याचिका दाखल करण्यात आल्याची शक्यता आहे. या प्रकारामध्ये सरकारी अधिकारी/संस्था आपले कर्तव्य पार पाडत नसतील तर त्यांना काम करण्यास भाग पाडण्यासाठी ही याचिका दाखल केली जाते.

मनोज जरांगे काय म्हणाले?

हैद्राबाद गॅझेटच्या जीआर विरुद्धची याचिका फेटाळल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता गोरगरिबाच्या बाजुने उभी राहते. सरकारला त्यांची बाजु भक्कमपणे मांडावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT