Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट! आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत 'हे' काम करावंच लागणार

Ladki Bahin Yojana e-KYC Update : राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना e-KYC करणं बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC Update
Ladki Bahin Yojana e-KYC UpdateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 Sep : राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

आदिती तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करत इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना e-KYC करणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. शिवाय ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यात करण्याचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.

आदिती तटकरेंचं ट्विट नेमकं काय?

आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Update
Vote Chori allegations : निवडणूक आयोगाने सगळे पत्ते खोलले; राहुल गांधींची 'आतली माणसं’ कोण?

योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी.

Ladki Bahin Yojana e-KYC Update
Chhagan Bhujbal News: भुजबळांचा खळबळजनक आरोप; म्हणाले,"अंतरवाली सराटीतील दगडफेकीच्या प्लॅनवेळी पवारसाहेबांचा आमदार...

ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.' दरम्यान, मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील ताण वाढत असून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसंच लाडक्या बहि‍णींची संख्या कमी करण्यासाठी आता राज्य सरकार मुद्दाम जाचक अटी आणि पडताळणी करत असल्याचा आरोपही सरकारवर केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com