Chandrashekhar Bawankule Sanjay Raut  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News: संजय राऊत म्हणतात, लवकरच बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार; फडणवीस सरकारमधील मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Maharashtra Politics: खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता.10 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत मंत्री होऊ शकतात, असं विधान करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी त्याही पुढे जाऊन दावा करत तसे चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील असंही म्हटलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे त्यांच्या रोखठोक भूमिका आणि राजकीय आरोपांनी चर्चेत असतात. राज्यातील सत्ताधारी असो वा विरोधक यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असलेले राऊत कोणतीही टीका करण्याची संधी सोडत नाहीत. तसेच सातत्यानं ते देवेंद्र फडणवीसांचं भविष्यातील राजकारण आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाविषयी मोठी भाकितं करत असतात. आता त्यांनी महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता.10 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत मंत्री होऊ शकतात, असं विधान करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी त्याही पुढे जाऊन दावा करत तसे चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील असंही म्हटलं आहे.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते असलेल्या संजय राऊतांनी एकीकडे बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाचा पुढचा चेहरा म्हणून प्रमोट करताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे पुन्हा अजिबात मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी राऊतांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांचाही रेकॉर्ड खूप खराब असल्याचं सांगत त्यांनाही मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून अलगद दूर सारलं आहे.

संजय राऊतांनी टाकलेल्या नव्या राजकीय बॉम्बवर आता महायुती युतीसरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

छगन भुजबळ हे शनिवारी(ता.10 जुलै) नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भुजबळ यांना शरद पवार यांची एनडीएतील एन्ट्री तसेच संजय राऊतांच्या दाव्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, पवार हे एनडीएमध्ये येतील असं मला अजिबात वाटत नसल्याचं सांगितलं.

त्यादिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय जवळच असल्यामुळे ते एकनाथ शिंदेंच्या केबिनला गेले. शरद पवार हे अनेक वर्षे मुख्यमंत्री होते आणि केंद्रातही मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासाठी सगळीकडे रेड कार्पेट असतो अशी राजकीय टिप्पणीही भुजबळ यांनी यावेळी केली.

संजय राऊतांनी केलेल्या देवेंद्र फडणवीस दिल्लीत मंत्री आणि बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या दाव्यावरही मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे याबाबत मला काही माहिती नसल्याचं सांगत भुजबळांनी यावर अधिकचं भाष्य करणं टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT