IPS News: मोठी बातमी: सात आयपीएस अधिकाऱ्यांनी सोडलं तडकाफडकी पद; राजीनाम्यामागं कोणाचा दबाव की वेगळं काही कारण?

Indian Administration Officers: देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या या वरिष्ठ आणि डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे पोलिस प्रशासनात उलटसुल चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने की कोणाच्या दबावाखाली आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.
IPS
IPS Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: देशभरातील सर्वच तरुणांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग(यूपीएससी) परीक्षेबाबत मोठी उत्सुकता असते. या परीक्षेसाठी वर्षानुवर्षे परीक्षार्थी कसून तयारी करत असतात. कोणाला पहिल्या तर कित्येकांचं अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर प्रशासकीय सेवेचे स्वप्नं पूर्ण होत असतं. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर काहीजण धडाकेबाज कामगिरीनं प्रशासनात आपला ठसा उमटवतात. मात्र,गेल्या काही महिन्यांत प्रशासनात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.

देशभरातील 7 आयपीएस अधिकाऱ्यांनी गेल्या 14 महिन्यांत धडाधड राजीनामा दिले आहेत. एकीकडे आयपीएस व आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगत वर्षानुवर्षे मेहनत घेतल्यानंतर ज्यावेळी खार्कीवर्दीचं कर्तव्यसेवेची संधी मिळते, त्याचवेळी या अधिकाऱ्यांंनी तडकाफडकी आपलं पदं सोडल्याचं दिसून येत आहे. काही वर्षांची पोलिस प्रशासनातील सेवा अद्याप बाकी असताना या 7 आयपीएस अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भुवनेश्वरमध्ये डीसीपी पदावर कार्यरत असलेल्या जगमोहन मीना यांनी अवघ्या 37 वर्षी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय पोलीस सेवेतील आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा देणाऱ्या गेल्या 14 महिन्यांतील त्या सातव्या अधिकारी ठरल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे आयपीएस पदाचा राजीनामा दिलेल्या 7 पैकी 6 अधिकाऱ्यांचं वय हे 40 पेक्षाही कमी आहे. सिद्धार्थ कौशल 35, रचिता जुयाल 35, जगमोहन मीणा 37, काम्या मिश्रा 32, लोकेश्वर सिंह 38 तर अभिषेक तिवारी यांनी 33 व्या वर्षी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यात राजीनामा दिलेल्यांमध्ये नुरुल होदा या एकमेव आयपीएस अधिकारी आहेत ज्यांचं वय 40 वर्षांहून जास्त असल्याचं आहे.

IPS
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा भाजपच्या हिंदुत्वावर घाव! प्रत्युत्तरासाठी एकनाथ शिंदे उतरले मैदानात; सिद्धीविनायक प्रकरणाची चौकशी लागणार?

देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या या वरिष्ठ आणि डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे पोलिस प्रशासनात उलटसुल चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने की कोणाच्या दबावाखाली आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री( PMO) जितेंद्र सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यामध्ये संसदेत एका प्रश्नावर उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली होती. सिंह यांनी देशभरात पोलिस दलातील रिक्त जागांची माहिती दिली होती. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलीस दलांतील मोठी 500 पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचं सांगितलं होतं.

IPS
Nida Khan Bail : निदा खानला जामीन देताना कोर्टाकडून श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला, न्यायालयाचा सविस्तर निकाल हाती...

पोलिस दलातील 500 पेक्षा अधिक पदे रिक्त असताना त्यात सीबीआय,आयबी या केंद्रीय तपासयंत्रणांचा समावेश आहे. मात्र, रिक्त पदांमुळे आधीच कामाचा अतिरिक्त ताण सहन करत असलेल्या भारतीय पोलिस दलांत सुरू असलेल्या राजीनामा सत्रांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामागची कारणंही समोर आली आहे. त्यात अवघ्या 35 व्या वर्षी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिलेले आंध्र प्रदेश केडरचे सिद्धार्थ कौशल हे यांनी प्रशासकीय सेवा सोडून कॉर्पोरेटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते रिलायन्स कंपनीचा भाग बनले आहेत.

IPS
Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरचं वादळ नाशिकमध्ये धडकताच उद्धव ठाकरे सावध, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला धाडलं

तर दुसरीकडे उत्तराखंड येथील 38 वर्षीय लोकेश्वर सिंह हे आयपीएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर युएन येथे स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांना मोठ्या पदाची काम करण्याची संधी मिळाली आहे.

तसेच बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी असलेल्या नुरुल होदा आणि काम्या मिश्रा यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारणं असल्याची माहिती समोर येत आहे. नुरुल यांनी वक्फ बोर्डच्या विरोधात भूमिका घेत राजीनामा दिला होता. तर काम्या मिश्रा यांच्याही भविष्यातील राजकीय प्रवेशाची एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे .

IPS
IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांना देशभरातील बड्या IAS अधिकाऱ्यांचे फोन : भेसळखोरीच्या मुळावरच घाव घालण्याचा प्लॅन

तर मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी व पोलिस प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना अभिषेक तिवारी यांनी सायबर क्राईमच्या तपासाची जबाबदारी सर्वात जास्त हाताळली होती. आता त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यवसायामध्ये उतरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com