Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत संपन्न झाला. तर, दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दरम्यान, मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पक्षाच्या वर्धापन दिनी मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवार यांची आठवण आली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २७ वा वर्धापन दिन साजरा करताना मन अनेक भावनांनी दाटून आले.
सोशल मीडियावर पोस्ट करत भुजबळ म्हणाले, पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे, असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि जनतेशी नाळ जुळलेले नेते अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीची जाणीव आज प्रत्येक क्षणी होत होती. हा वर्धापन दिन आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावनिक होता. जड अंतःकरणाने ध्वजारोहण करून अजितदादांना विनम्र अभिवादन केले.
'पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या २७ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला, सर्वांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने विकासाचे राजकारण केले आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे काम केले. या दीर्घ प्रवासात असंख्य कार्यकर्त्यांचे अमूल्य योगदान आणि जनतेचा विश्वास हीच पक्षाची खरी ताकद राहिली आहे.', असे त्यांनी सांगितले.
'अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आणि जनसेवेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प आजच्या वर्धापन दिनी सर्वांनी केला.', असे देखील त्यांनी सांगितले.
आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात.आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत.त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा आम्हा सर्वांचा ठाम संकल्प आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.