Sameer Bhujbal: मंत्रिपद नाकारलं, काकांना राज्यसभेला डावललं... तरीही समीर भुजबळांकडून भाजपचं भरभरून कौतुक

Samir Bhujbal, NCP Rajya Sabha, Maharashtra Cabinet: राज्यसभेच्या उमेदवारीत राजेंद्र जैन यांची निवड झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षनिष्ठेची भूमिका अधोरेखित केली.
Sameer Bhujbal
Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Samir Bhujbal NCP: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली. त्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीला जाण्याची संधी मिळेल अशा चर्चा होत्या. आपल्याला दिल्लीत पाठविल्यास रिक्त होणाऱ्या मंत्रीपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव मंत्री भुजबळ यांनी दिला होता. त्याबाबत निर्णय न झाल्याने ऐनवेळी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची लॉटरी लागली.

या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमध्ये चांगलेच राजकीय तरंग उठले आहेत. त्याचा समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदाशी थेट संबंध आहे. या संदर्भात समीर भुजबळ यांनी पुन्हा एकदा सुचक वक्तव्य केले आहे.

Sameer Bhujbal
Sameer Bhujbal : मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाबाबत काय सांगितलं होतं? : समीर भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी...

याबाबत आपण नाराज आहात का? पक्षाकडून भविष्यात काही नव्हे आश्वासन मिळाले आहे का? आपली पुढील राजकीय वाटचाल काय? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर समीर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

समीर भुजबळ म्हणाले, माझ्या मंत्रीपदाचा प्रस्ताव घेऊन पक्षाचे सर्व नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाकडून त्याला कोणताही विरोध झाला नाही, यावर त्यांनी विशेष जोर दिला.

Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : सुनिल तटकरेंना जो न्याय तोच भुजबळांना हवा, विषय थेट दिल्लीपर्यंत पोहोचला...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिक्त होणाऱ्या मंत्रीपदावर शपथविधीला काही कालावधी लागतो. तुर्त त्यासाठी कालावधी नाही. भविष्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रसंगी निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल अशी भूमिका घेतली होती.

"माझ्या मंत्री पदाबाबत पक्षातून काही नेत्यांचे वेगळे मतप्रवाह असू शकतील. यासंदर्भात राज्यभरातील समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. अनेकांनी आपल्याकडे तसे बोलून देखील दाखवले," असे समीर भुजबळ म्हणाले.

Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : साहेब निर्णय घ्या...! येवल्यात झळकले पोस्टर्स ; समर्थकांची नाराजी, छगन भुजबळ खरोखर निर्णय घेणार?

"मी नाराज नाही. दुसऱ्याच दिवसापासून मी कामाला सुरुवात केली आहे. सध्या माझे बॅडलक असावे. मात्र भविष्यात नक्कीच गुडलक येईल. त्याविषयी मला कोणतीही शंका वाटत नाही. त्यामुळे नाराज होऊन घरी बसणारा मी कार्यकर्ता नाही." असेही ते म्हणाले.

''शिवसेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातही आम्ही काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी कार्यरत आहे. पक्षाची स्थापना झाली तेव्हा षण्मुखानंद सभागृहातील मेळावा आणि शिवाजी पार्क येथील सभा या दोन्हींच्या तयारी पासून ते पक्ष नोंदणीचे सर्व काम आम्ही दहा दिवसांत केले. मी नेहमीच बॅक स्टेजला राहणारा आहे. कधीही व्यासपीठावर जात नसतो. पक्षाकडे आजपर्यंत काहीही मागितलेले नाही. शरद पवार असो व अजित पवार यांनी माझी क्षमता ओळखून मला संधी दिली'' असेही समीर भुजबळ यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com