Sharad Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics : ...अन् शरद पवारसाहेब माझ्यावर भडकले, छगन भुजबळांनी सांगितला सत्तांतराच्या आधीचा किस्सा

Sharad Pawar Got Angry On Chhagan Bhujbal : मी जेलमध्ये असताना 2017 ला उद्योगपतीसोबत मिटींग झाल्याचे अजितदादा सांगता कुणाला कोणते मंत्रिपद दायचे हे देखील ठरले, असे छगन भुजबळांनी सांगितले.

Roshan More

Chhagan Bhujbal : जुलै 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार हे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवेसेनेसोबत जात उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर छगन भुजबळ देखील त्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. या सत्तांतराच्या आधी काय घडत होते. याचा किस्सा छगन भुजबळ यांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितला.

छगन भुजबळ म्हणाले, भाजपसोबत जाण्याचे आमचे ठरले होते. पण आमच्याआधीच शिंदे त्यांच्यासोबत गेले. पण त्यानंतर देखील सरकारसोबत गेले पाहिजे, असे सगळ्यांन वाटत होते. पवारसाहेबांनी एक चिठ्ठी अजित पवार, प्रफुल पटेल आणि जयंत पाटलांकडे दिली होती. त्यामध्ये आपल्याला काय हवे आहे हे होते. इंदौर मार्गे बडोद्याला जायचे देखील ठरले. जयंत पाटील साहेबांना विचारायला गेले की साहेब आम्ही चाललो म्हणून तर साहेब म्हणाले कुठे चालला तुम्ही. त्यांन पाहिजे तर ते येतील. त्यामुळे पुन्हा फिसकटले.'

'मला जेष्ठ म्हणून अजित पवारासंपासून सगळे पुढे करायचे की तुम्ही साहेबांशी बोला, तुम्ही बोला.मी पवारसाहेबांना त्याविषयी बोलायचो. त्यामुळे एक दिवस साहेब माझ्यावर भडकले. जा जा तुम्हाला मंत्री व्हायचे असेल तर जा तिकडं.', पवारसाहेब आपल्यावर चिडल्याचा किस्सा छगन भुजबळांनी मुलाखतीमध्ये सांगितला.

2014 पासून भाजपसोबत चर्चा

निवडणुकीच्या आधीपासून मी जेलमध्ये होतो. 2014 ला शिवसेना भाजप एकत्र होती.राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र होती. त्यावेळी आमच्या नेत्यांना वरून सांगण्यात आलं की आम्ही काँग्रेस सोडतो तुम्ही (भाजप) शिवसेना सोडा. आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ. त्यांनी (भाजप) शिवसेनाला ताबडतोब सोडले. ती विधानसभा निवडणूक सगळे वेगवेगळे लढले.

अलिबागच्या अधिवेशनात पवारसाहेब म्हणाले की फडणवीसांनी आमचा पाठीबा कायमस्वरुपी ग्रहीत धरू नये. त्यामुळे घाईघाईने विरोधीपक्षनेते असलेल्या एकनाथ शिंदेंना आणि शिवसेनेला फडणवीसांनी जवळ घेतले आणि मंत्री केले.

मी कुठल्याही चर्चेत नव्हतो

'मी जेलमध्ये असताना 2017 ला उद्योगपतीसोबत मिटींग झाल्याचे अजितदादा सांगता कुणाला कोणते मंत्रिपद दायचे हे देखील ठरले. शेवटी पवारसाहेब म्हणाले की शिवसेनेला तुम्ही सोडा आपण दोघेच राहू. शिवसेना आमचा जुना पार्टनर आहे आम्ही त्यांना नाही सोडणार, असे त्यांनी (भाजप) सांगितले. 2019 ला निवडणुकीच्या आधी काही तरी चर्चा झाली. या चर्चेत मी नव्हतो. कुठल्याही चर्चेत मी नव्हतो. पवारसाहेब, अजितदादा, प्रफुल पटेल हे चर्चा करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT