NCP vs Bjp : आरोपांचं रण पेटलं! अजित पवारांच्या आमदाराचा आरोप भाजपने फेटाळला; स्वबळाच्या हट्टावर बावनकुळेंचा शिस्तीचा सल्ला!

Ajit Pawar MLA accusation News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी आरोप केल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. ही वेळ सध्या टीकाटीपणी करण्याची नाही आणि आपण सर्व एकत्रच लढणार असल्याचेही सांगितले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : गडचिरोलीमध्ये माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनी काम केले. बंडखोरांना उभे केले. त्यांना आर्थिक मदत केली असा खळबळजनक आरोप माजी वनमंत्री तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. ही वेळ सध्या टीकाटीपणी करण्याची नाही आणि आपण सर्व एकत्रच लढणार असल्याचेही सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नागपूर आणि अमरावती विभागाचा शुक्रवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळव्यात बोलताना रोखठोक मत व्यक्त केले होते. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याच नेत्यांनी दगा दिला. बंडखोरांना आर्थिक मदत केली. मला पाडण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे आता महायुती करण्याची गरज नाही. गडचिरोली जिल्ह्यात महायुतीची आम्हाला गरज नाही. आम्ही स्वबळवरच लढणार आहोत. गडचिरोलीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावून दाखवतो असे आव्हानही त्यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांना दिले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
Dhananjay Munde : भुजबळांना खातंही मुंडेंचं अन् बंगलाही मुंडेंचा, धनंजय मुंडेंना 15 दिवसांत सातपुडा खाली करण्याचे आदेश

बाबा आत्राम यांच्या वक्तव्याचे कोणीच खंडन केले नाही. मात्र याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. बावनकुळे यांनी धर्मराव बाबा आत्राम काय बोलले, हे मला माही नाही, परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या ही भाजपची (BJP) भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Congress party future : काँग्रेसचे भवितव्य काय असणार? सत्यजीत तांबे म्हणाले, 'दिल्लीतील 'ती' चांडाळ चौकडी...'

निवडणुका जाहीर झाल्यावर आम्ही एकत्र बसणार आहोत. मुंबई पासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुतीत एकत्रित लढणार आहे. स्थानिक स्तरावर वेगवेगळे लढण्याची चर्चा आहे. मात्र महायुतीचा निर्णय एकत्र लढण्याचा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Pune cyber scam : गुजरातच्या मास्टरमाईंडने पुण्यात बसून अमेरिकेतील लोकांना घातला गंडा

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केले. 288 आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडून आणण्यासाठी मी दोन बैठका घेतल्या. आता याने काम केले, त्याने काम केले हे बोलण्याचे दिवस नाहीत. आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे टीकाटीपणीचे दिवस नाही, असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

Chandrashekhar Bawankule
Vasant More On Election : वसंत मोरेंना वेगळाच संशय, म्हणाले, 'निवडणूक आल्या की कोरोना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com