Chhagan Bhujbal Dhananjay Munde  sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Video : परदेशातून परतताच छगन भुजबळ धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदावर बोलले, 'त्यांचे काढून मला...'

Chhagan Bhujbal Dhananjay Munde ministerial post : मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परदेशात निघून गेले होते.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: माजी मंत्री छगन भुजबळ प्रदेश वारी करून नाशिकला परतले आहेत. आज ते महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करीत आहे. भुजबळ यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परदेशात निघून गेले होते. त्यामुळे नाराज भुजबळ परदेशातून परतल्यानंतर काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले होते. परदेशातून भुजबळ आज (गुरुवारी) नाशिकमध्ये आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदावरून दूर करण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळ यांना देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले,'विजय वडेट्टीवार आणि आव्हाड यांनी काय सांगितले त्यावर मी काहीही मत व्यक्त करणार नाही. मात्र कोणाला काढून मला द्या असेही माझ्या मनात नाही, हे मी स्पष्ट करतो.'

भुजबळ यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सूचक वक्तव्य केले आहे. राज्यात मंत्रिमंडळाच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. त्यासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांचा आधार घेत ते म्हणाले, "तुका म्हणे उगी रहावे, जेजे होईल ते ते पाहावे"

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख याची क्रूर हत्या करण्यात आली. यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आहे. यावरून राज्यभर तीव्र आंदोलन सुरू आहे. त्याचा मोठा राजकीय दबाव राज्य शासनावर निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावे, असा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांचे विधान सुचक मानले जाते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT