Chhagan-Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics : मनोज जरांगेंना मदत करणारे नेते भुजबळांच्या टार्गेटवर, म्हणाले, 'धडा शिकवणार'

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काही नेते मदत करत असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला. तसेच त्या नेत्यांना इशारा देखील दिला.

Roshan More

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांनी गुरुवारी नागपूरमध्ये समता परिषदेचा मेळावा घेत मनोज जरांगे पाटील यांना मदत करणाऱ्यांना धड शिकवणार असल्याचा इशारा दिला. ते म्हणाले, निवडणूक आली की जरांगे आंदोलन करायला उभा राहतो. त्याला राजकारणातील काही लोक मदत करतात. पण ओबीसी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'ओबीसीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशेचा किरण आहे. ते म्हणतात की भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे. त्यांना ओबीसींना संभाळावे लागणार आहे. ओबीसींना संभाळले तर इतर समाजाच्या लोकही तुमच्या मागे उभे राहतील.'

'आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. त्यासाठी राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. सामाजिक मागासलेपणावर आरक्षण दिले जाते, आर्थिक मागासलेपणावर नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको. त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र त्यांना स्वातंत्र्य आरक्षण देण्यात यावे', असे देखील भुजबळ म्हणाले.

ओबीसींना सवलती द्या

भुजबळ म्हणाले, 'गेल्या 25 वर्षांत ओबीसी महामंडळाला दोन हजार 500 कोटी मिळाले तर,मागील तीन वर्षात मराठा समाजाला 25 हजार कोटी देण्यात आले. शिक्षणात मराठ्यांना सवलती, फी सवलत, स्काॅलरशीप,विद्यार्थ्याला वर्षाला 60 हजार रुपये मिळतात. ती सोय ओबीसी विद्यार्थ्यांना देखील नाही.'

जीआर रद्द करा किंवा बदल करा

आपल्या लढ्याला यश मिळेल. कोर्टात चार ते पाच रीट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आम्ही चांगले वकील दिले आहेत. आपल्याल न्याय मिळेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. सरकारने जीआर रद्द करावा किंवा त्यात बदल करावा, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT