Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

OBC News : 'ओबीसींची भूमिका लक्षात घ्या, अन्यथा...'; छगन भुजबळांचा महायुती सरकारला थेट इशारा!

Political News : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी त्यांनी राज्य सरकारला घेरले असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी त्यांनी राज्य सरकारला घेरले असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राज्यातील ओबीसी समाज त्यांच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडून काही आश्वासने दिली आहेत. या घडामोडींनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला असून नेत्यांना खडे बोल सुनावले.

प्रसार माध्यमाशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, 'महायुतीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचे सरकार आणण्यात त्यांचाही हातभार आहे, असे सांगत त्यांनी सरकारला ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करण्याच्या चर्चेवरही त्यांनी आक्षेप घेतला. आता मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करणार आहेत, हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा. मराठा समाजाला दाखला देण्यास आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना, ओबीसी आरक्षण संपता कामा नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

राज्यातील जात पडताळणी समितीच्या कामकाजावर कोणताही दबाव आणू नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. काही प्रमाणपत्रं जात पडताळणी समितीने नाकारली असून, ती दुरुस्त करून देण्याचं काही आमदारांकडून सांगितलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून भुजबळांनी संबंधित आमदारांना थेट सवाल केला. मुंबईत चार नगरसेवकांची जात पडताळणीतील प्रमाणपत्रं रद्द झाल्याने त्यांचं पद गेले. त्यांचंही प्रमाणपत्र तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कुणबी प्रमाणपत्रांबाबतही भुजबळांनी गंभीर आरोप केले. काही दाखल्यांमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचा दावा करत, “खाडाखोड केलेले हे दाखले तुम्ही स्वीकारणार आहात का?” असा सवाल त्यांनी सरकारला केला. जात पडताळणी समिती ही अत्यंत महत्त्वाची संस्था असून, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणला जाऊ नये, असेही भुजबळ म्हणाले.

यासोबतच ओबीसी आरक्षण घेत आहेत, एसईबीसी आरक्षण घेत आहेत की ईडब्ल्यूएस आरक्षण घेत आहेत? एक विद्यार्थी तीन आरक्षणांचा कसा काय फायदा घेऊ शकतो?” असा सवाल करीत त्यांनी ओबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या आरक्षणांबाबतही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT