Chhagan Bhujbal Samata Parishad Meeting in Nashik : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी 29 ऑगस्टला आंदोलन पुकारले असून तयारी सुरू केली आहे. आता संपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. असे असताना, दुसरीकडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आलं आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राज्यभरातील प्रमुख समता सैनिक या बैठकीला उपस्थितीत होते.
बैठकीत जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरही आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेलं वक्तव्य अमान्य असल्याचे बोलून दाखवले.
ओबीसीचे आरक्षण संपले असे कोणी सांगितले? फक्त काही जाती-जमाती मागणी करताय की आम्हाला ओबीसीत घ्या म्हणून. आता त्यात सुद्दा जे खरे ओबीसी आहे ते जात पडताळणीत पास होतात. जे चुकीचे आहेत ते नापास होतात. त्यामुळे सगळं संपलंय असं नाही. जात पडताळणीमध्ये काही चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. जात जनगणना करावी ही आमची मागणी 2011 पासून होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असं भुजबळ म्हणाले.
जरांगेंची लढाई आमच्याविरोधात नाही....
मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, हा लढा शासनाच्या विरोधात आहे. कुणबी जात प्रमाणपत्रे पडताळणी समितीकडून रद्द का केली जात आहे असा त्यांचा सवाल असून त्याला शासन उत्तर देत आहे. त्यावर आम्ही काय बोलणार, सरकार त्यावर बोलतील आणि निर्णय घेतील, असे सूचक विधान भुजबळांनी केले. आम्ही विनाकारण मध्ये घुसून 'आ बैल मुझे मार' असे म्हणण्याचे कारण नाही असं भुजबळांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आम्ही जात जनगणना मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत असल्याचं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.