Maharashtra Third Alliance Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Third Alliance : तिसरी आघाडी वाढवतेय ताकद? चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजे, कडू, शेट्टी एकत्र येणार

Nanded and Parbhani Tour of Sambhaji Raje, Badu, Shetti : छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी नांदेड आणि परभणी इथं उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असणार आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या चाचपणीच्या तयारी असलेले नेते राज्यात ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्ताने उद्या बुधवारी एकत्र येत आहेत. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी, हे दिग्गज नेते एकत्रित ओला दुष्काळाची पाहणी दौऱ्यात एकत्र असतील.

यानिमित्ताने तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताचे राज्य यावे आणि परिवर्तन घडावे, यासाठी राज्यात या दिग्गज नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे उद्याच्या नांदेड आणि परभणी दौऱ्याला महत्त्व आले आहे.

छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा उद्या सोमवारी भाजप (BJP) नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेला नांदेडमधून सुरू होणार आहे. नांदेड आणि परभणीमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी हे दिग्गज नेते घेणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, डॅा. राजरत्न आंबेडकर यांचा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि नारायण अंकुशे यांचा भारतीय जवान किसान पक्ष दौऱ्यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या पक्षाच्या नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी होतील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा होत आहे, त्या चर्चेला या दौऱ्यानिमित्ताने आणखी ताकद देण्याची तयारी या नेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जात आहे.

राजू शेट्टी यांनी मध्यतंरी राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. शेतकरी, कामगारांसह इतर संघटनांना एकत्र करून राज्यात 'परिवर्तन आघाडी' स्थापन करू, असे संकेत दिले होते. याशिवाय विधानसभा निवडणुकीला चांगले उमेदवार देऊ असल्याचे देखील म्हटले होते. राजू शेट्टी या दौऱ्यात नेमकं काय भूमिका घेतात, याकडे शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडूंची भूमिकेकडं लक्ष

बच्चू कडू यांनी देखील तिसऱ्या आघाडीपेक्षा शेतकरी आणि कामगारांसाठी स्वतंत्र आघाडी असू शकते, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना शेतकरी, कामगार आणि इतर प्रश्नांवर प्रस्ताव देऊन चर्चा करू. पण, त्यांना मान्य न झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार, असे संकेत बच्चू कडू यांनी पूर्वीच दिले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक लहान पक्ष आणि संघटना आहे, ते तिथे नाराज आहेत, त्यांना आम्ही बरोबर घेऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नांदेड आणि परभणी दौऱ्याच्यानिमित्ताने एकमेकांच्या चाचपणीसाठी एकत्र येणारे दिग्गज नेते तिसऱ्या आघाडीची चाचपणी करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

संभाजीराजेंचे जरांगेसाठी प्रयत्न

छत्रपती संभाजीराजे देखील तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. या तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे यांनी यावे, यासाठी संभाजीराजे प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. त्यांची महाराष्ट्रात ताकद आहे, आणि तिसरी आघाडी राज्यात परिवर्तनासाठी लढा देत आहे, असे म्हणत, संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांनी देखील साथ घातलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या उद्याच्या बुधवारी दौऱ्याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT