PM Modi  sarkarnama
महाराष्ट्र

PM Modi apologies : पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पण महाविकास आघाडीचे नेते भडकले, पुतळा...

PM Modi apologies for Shivaji maharaj Staute accident jayant patil Jitendra Awhad Vijay Wadettiwar : आज पंतप्रधानांनी महाराजांची माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Roshan More

PM Modi apologies : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात माफी मागितली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) जाहीर माफी मागितली.

नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांचा माफीनामा कबूल नसल्याचे सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज पंतप्रधानांनी महाराजांची माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही. ना त्यावर एकही शब्द काढला. जिथे महात्म्यांचा आदर करण्याचा विषय येतो, तिथे हे सरकार केवळ भावनांचा खेळ करतं, केवळ प्रतीकांचा उदोउदो करतं.'

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी सरकारला इशारा ही दिला आहे.'मनापासून रयतेच्या गरजांचा विचार आणि त्यांची सेवा करायची असते. तेव्हाच, आपण केलेलं बांधकाम 3-4 शतकांनंतरच्या पिढीलाही पाहायला, जगायला आणि वापरायला मिळतं. नाहीतर, खोटी प्रतीकं आणि खोट्या भावनांच्या पायावर उभारलेलं राज्य ढासळायला 8 महिनेही लागत नाहीत', असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

...तर माफीवर विश्वास बसला असता

'पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत!

त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का, हा संशय येतोय.', असे ट्विट करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांची माफी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मागितली असल्याचे म्हटले आहे.

प्रायश्चित अटळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही.प्रायश्चित अटळ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT