Ambadas Danve : पुतळा कोसळल्यानंतर माफीनामा पण अंबादास दानवेंचे 'हे' चार प्रश्न उडवणार CM शिंदेंची झोप

Chhatrapati shivaji maharaj statue collapsed Ambadas Danve Eknath Shinde : राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती नेमत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली होती.
Ambadas Danve Eknath Shinde
Ambadas Danve Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve News : मालवणमधील राजकोट किल्ल्यामधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी सरकारने समिती देखील नेमली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. मात्र, या प्रकरणात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना शिवरायांप्रती आत्मीयता असेल तर आपल्या प्रश्नांची उत्तर द्यावे असे म्हणत चार प्रश्न विचारले आहेत.

आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारले आहेत.

'वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का?', असा पहिला प्रश्न विचारत दानवेंनी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुतळा कोसळल्या प्रकरणी नेमलेल्या समितीवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.

Ambadas Danve Eknath Shinde
Gokul Dudh Sangh : गोकुळच्या सभास्थळी गोंधळ, बॅरिकेट्स तोडले; पोलिस अन् सभासदांमध्ये...

आपल्या दुसऱ्या प्रश्नात दानवे यांनी पुतळ्याच्या उंचीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला?', असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला.

राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लाल भडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का? तसेच विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का? असे प्रश्न देखील दानवेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना ट्विटरवर विचारले आहेत.

पंतप्रधान मोदींचा माफीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवारी) पालघरमध्ये वाढवण बंदराच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली.

Ambadas Danve Eknath Shinde
Balasaheb Thorat : अजब-गजब कारभार, शिवद्रोही मोकाट आणि शिवप्रेमी स्थानबद्ध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com