Jaydeep Apte, Shivaji Maharaj Statue Sarkarnama
महाराष्ट्र

Jaydeep Apte : आपटे को पकडना मुश्किलही नहीं नामुमकिन है! पोलिसांकडून लूक आऊट नोटीस

Rajanand More

Mumbai : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्यावरून राजकारण तापले असून विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच सिंधुदुर्ग पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकालाही अटकही केली आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून आपटेचा थांगपत्ता लागत नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली असून राज्याच्या विविध भागात शोध सुरू असल्याचे समजते. फरार आपटेचा शोध लागत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढत चालला आहे.

आपटे अजूनही फरार असल्याने सिंधुदुर्ग पोलिसांनी आता लूक आऊट नोटीस जारी केली आहे. आपटे परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलिस मागील आठ दिवसांपासून त्याचा शोध घेत असले तरी तो हाती लागलेला नाही. त्यामुळे तो परदेशात पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही नोटीस जारी केल्याचे समजते.

दरम्यान, आपटे सापडत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. आपटे को पकडना सिर्फ मुश्किलही नहीं नामुनकिन है, असे म्हणत आव्हाडांनी टीका केली आहे. ज्या माणसाने एकही पुतळा साधा क्लेचाही बनवला नव्हता. त्याच्याकडे डिग्री नाही, असे आव्हाड म्हणाले.

कुठलाही अटी-शर्ती पार न करता पुतळा बसवला जातो. चार दिवस आधी त्याचा हात कोसळतो. अशा माणसाला काम कुणी दिलं, हे कसं घडलं, यावर बोलायला पाहिजे. जेवढा जयदीप आपटे दोषी आहे, तेवढेच त्याला काम देणारेही दोषी असल्याचे टीका आव्हाड यांनी केली आहे.

वर्षावर लपून बसले?

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अजूनही ठेकेदार, शिल्पकार सापडत नाही. ते वर्षा बंगल्यावर तर लपून बसले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्यांच्यासोबत आम्ही पाहत आहोत, त्यांनी तर त्याला लपवले नाही ना, ही शंका आता लोकांच्या मनात असल्याचे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT