Aaditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्टरमधील फरक कळत नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Mumbai BMC Political News : स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी फेब्रुवारीत लोकायुक्तांसमोर होणार सुनावणी.

Sachin Waghmare

Mumbai News : स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी फेब्रुवारीत लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. मुंबईच्या आयुक्तांनाही या प्रकरणात चौकशीसाठी बोलवले आहे. त्याशिवाय मलाही सुनावणीसाठी बोलवण्यात आले आहे. वर्षभरात मुंबई महापालिकेतील 6 हजार 80 कोटी रुपयांचे घोटाळे उघड केले आहेत.

त्यामुळे 125 कोटी रुपये वाचले आहेत. केंद्राच्या आदेशाने सरकारकडून महापालिकेची लूट सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री अणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यासोबतचा मुख्यमंत्री शिंदे यांना ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्टरमधील फरक कळत नाही, अशा कानपिचक्याही दिल्या.

मुंबईत माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली. बरेचसे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मात्र, उद्घाटनाला वेळ नसल्याने अनेक प्रकल्प रखडलेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Ekanath Shinde) स्वतःच्या जिल्ह्यातील प्रकल्पांचे उद्घाटन करायला वेळ नाही. तर इतर ठिकाणचे उद्घाटन कसे करणार, असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री भाजपने दिलेली स्क्रिप्ट वापरतात

यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. भाजपच्या आमदाराने दावा केला होता की, कंत्राट रद्द झाली आहेत. मात्र, कुठलीच कंत्राटे रद्द झालेली नाहीत. 'घटनाबाह्य मुख्यमंत्री भाजपने दिलेली स्क्रिप्ट वापरत आहेत.

त्यांची तेवढीच पोच आहे, त्यामुळे ते तेवढेच करत आहेत', अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. येत्या काळात लोकशाही पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT