Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील केली आहे. त्यातच आगामी काळात राज्यातील होणाऱ्या निवडणुका पुढे जातील, अशा चर्चा राजकीय पटलावर रंगल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे.
साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी मुलाखत घेतली. आगामी काळात होणाऱ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वेळेवर होतील, राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता येत्या काळात आम्हाला योग्य न्याय देईल, असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. (CM Eknath Shinde Interview)
राज्यातील निवडणुका वेळेवर होणार आहेत. त्यामुळे आम्ही येत्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाच्या जोरावर व लोकोपयोगी जनतेसाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व कामाच्या जोरावरच येत्या काळात जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या वेळेवरच होणार आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्याचा फायदा जनतेला होत आहे. राज्यातील बेरोजगारी हटविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्याचा फायदा येत्या काळात सरकारला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकरकडे योजना राबवण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोप केला जात आहे. ३३ हजार कोटी रुपयांची विविध योजनेसाठी तरतूद केली आहे. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. काही जण कोर्टात गेले आहेत. लाडकी बहीण योजनेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार जे बोलते ते करून दाखवते. लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. येत्या काळात दीड हजार रुपयांमध्ये वाढ करणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.