Mumbai News : लाडकी बहीण योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीमधील दोन पक्षात वाद झाला. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. एवढेच नव्हे तर चॅनलवर पाहिले की, देवेंद्रजी SOP करणार आहेत. जाहीरात कशी करायची, कोणी करायची, हे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना SOP करावी लागते, ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शिवसेनेचे काही जण अजित पवारांवर (Ajit Pawar) नाराज होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असताना गुवहाटीला गेले होते. आता सर्वच जण अजित पवारांना टार्गेट करत आहेत. आमचे महाविकास आघाडीचे सरकार याच मंडळीने ईडीच्या भितीने पाडले, अशी टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. (Supriya Sule News)
सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना महायुतीच्या कारभारावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांना सबलीकरण करण्यासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. हे स्वार्थी सरकार आहे. लोकसभेला अपयश आल्यावर लाडकी बहीण आठवली. फक्त विधानसभा निवडणूका हे एकच लक्ष ठेवून योजनेची घोषणा करण्यात आली. भाऊ-बहिणीच्या नात्यांचा हा अपमान आहे. जे कॅबिनेटमध्ये झाले ते योग्य नाही, अशी टीका ही त्यांनी केली.
महायुतीच्या सरकरने केवळ राजकीय पोळ्या भाजण्यासाठी लाडकी बहीण योजना काढली आहे. खरच ही योजना असती तर श्रेय वाद नसता केला. येत्या काळात कोणाचे सरकार येईल ते जनता ठरविणार आहे.
पवार, ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. भाजपकडून बोलले जात आहे, याचा अर्थ त्यांना परत निवडणूका घ्यायच्या नाहीयेत का? भाजपला संविधान बदलायचे आहे, हे स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या.
परकीय गुंतवणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पण या डेटाचा अभ्यास करत आहे. डायरेक्ट गुंतवणूक कुठे झालीये हे दाखवले पाहिजे. कोणत्या भागाला मिळाले, कुठे रोजगार मिळाले हे पण दाखविण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.