Laxman Hake Sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला सरकार 'फेस' करणार; लेखी आश्वासन देणार?

Laxman Hake Will Meet Chief Minister Eknath Shinde Delegation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध करत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची थोड्याच वेळात भेट घेणार आहे.

Pradeep Pendhare

OBC Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीवर बेमुदत उपोषणावर बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलानाची सरकारने दखल घेतली असून, त्यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ रवाना झाले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला नकाराबरोबच 54 लाख कुणब्यांच्या नोंदी सापडल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी लक्ष्मण हाके मागणी आहे. तसेच यावर सरकारचे शिष्टमंडळ काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. वडीगोद्री हे अंतरवाली सराटीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी आंदोलन करतात.

सध्या मनोज जरांगे यांच्याव छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध करत बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. ओबीसी संघटनांचा हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. यातच काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत काल भेट दिली.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनास्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संवाद साधला. आंदोलनाची स्थिती सांगितली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीसाठी लवकरच पाठवत आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार सरकारचे शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना झाले आहे. यात गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला येण्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. सरकारने मराठा आंदोलनानंतर 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे जाहीर केले होते. यानंतर सगेसोयरे व्याख्याची अधिसूचना काढली होती. त्यावर हरकती घेण्यात आल्या होत्या.

यासंदर्भात काय कारवाई केली याची सविस्तर माहिती देण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला पूर्ण आरक्षणाला विरोध आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने यावर लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका लक्ष्मण हाके यांनी मांडली. लक्ष्मण हाके यांच्या या मागण्यांवर सरकारचे शिष्टमंडळ काय भूमिका मांडते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT