Maratha Vs OBC Politics : ओबीसी आंदोलनाच्या मंचावर गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले. आंदोलकांची आवस्था पाहून गहिवरलेल्या वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधून स्थितीचे गांभीर्याची जाणीव करून दिली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना टार्गेट केले.
मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक मुलांनी टोकाचे पाऊल उचलले. यात काही तरुणही गेले. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या डोळ्यांत पाणी आले नाही. आज मात्र पाणी आले. चांगले आहे, अशा शब्दात जरांगे पाटील हल्लाबोल करत वडेट्टीवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील Chandrakant Patil म्हणतात की सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची गरज नाही; पण आम्ही काय म्हणतो ते सरकारने लक्षात घ्यावे. मी सरळ-सरळ सांगतो मुख्यमंत्रीसाहेब आणि शंभुराजे देसाई, आम्ही दिलेली व्याख्या मान्य असेल तर सगेसोयरे अंमलबजावणी करा. चंद्रकांतदादा म्हणतात तसे करू नका; नाहीतर आमची फसवणूक होईल. ती करू नका, सगेसोयरे व्याख्या शिष्टमंडळ आले त्यावेळीच ठरली होती, याकडे लक्ष वेधत आता पुन्हा फसवणूक करताय, असा संतापही जरांगेंनी व्यक्त केला.
तुम्हाला देता येत असेल तर द्या. खोटी अंमलबजावणी करायची असेल तर करू नका. आम्हाला वेड्यात काढू नका. मुंबईत डझनभर सचिव आले होते. तिथे आम्ही व्याख्या लिहून दिलेली आहे. सुमित भांगे आणि केसरकर होते, मग आता धोके का देताय, असा प्रश्नही जरांगेंनी सरकारला विचारला आहे.
सरसकट कुणबी अशी आमची मागणी होती आणि हीच मागणी आहे. मध्येच काहीतरी खूळ काढताय, त्यात नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार का ते सांगा, मगच अंमलबजावणी करा. आतापर्यंत म्हणत होते तुमच्याप्रमाणे देतो, आता पाटील वेगळी प्रेस घेतात, महाजन तिसरेच बोलतात. 13 जुलैपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवू त्यानंतर बघू, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे पाटलांनी राज्यातील मराठा समाजातील नेत्यांनाही कडक शब्दांत सुनावले आहे. मराठ्यांच्या नेत्यांनी लाज वाटू द्या, तुमच्या लेकरांना आरक्षण नाही. त्यांना आरक्षण असून ते किती लढतात बघा. तुम्हाला विधानसभेला कळेल तुम्हाला मराठ्यांची किती गरज आहे, आम्ही विश्वास ठेवला आहे. आंदोलन करणारे आपले विरोधक नाही त्यांना विरोध नाही. मुलींचे पदवीपर्यंत शिक्षण मोफत करू म्हणाले, करत नाही. यांना करायचे नाही. यांना मराठ्यांना पिळायचे आहे, असा आरोपही जरांगेंनी केला.
10 टक्के आरक्षण टिकणार नाही. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे. वरचे टिकणार नाही. त्यामुळे ते 10 टक्के न टिकणारे आरक्षण मान्य नाही. तसे सगेसोयरे आमची व्याख्या पाहिजे. तुमचे मान्य नाही. 14 जुलैनतर नंतर आम्ही आमचा बघू, काय करायचं करू. 13 जुलैला आम्हाला फसवले की तुमचा कार्यक्रम केलाच समजा, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.