Prakash Ambedkar on the alleged RSS link in the attack case involving CJI Bhushan Gavai. Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar on RSS : CJI गवईंवरील हल्लाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा; म्हणाले, ‘तो’ वकील RSS च्या शाखांमध्ये...

Prakash Ambedkar Statement on CJI Bhushan Gavai Attack : हल्ल्याचा प्रयत्न करणाऱा वकील राकेश किशोर याने परमात्म्याने आपल्याकडून हे करवून घेतल्याची प्रतिक्रिया मीडियाशी बोलताना दिली होती.

Rajanand More

RSS link alleged: Who is lawyer Rakesh Kishor? : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणाचा अनेकांनी निषेध करत संबंधित वकिलावर कारवाईची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही बुधवारी या घटनेवर संतप्त भूमिका मांडताना ही घटना नसून संदेश असल्याचे सांगत सावध केले होते. आता त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कनेक्शन जोडले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर ‘आरएसएस’ची चुप्पी हे सिध्द करते की, ती या हल्ल्यामागील सनातनी आणि मनुवाद्यांना प्रेरित करणारी शक्ती आहे. तसेच भविष्यात उच्च प्रशासकीय पदांवर बसलेल्या दलितांवरही अशाच प्रकारे हल्ल्यांचे ते समर्थन करतील.

हल्ल्याचा प्रयत्न करणाऱा वकील राकेश किशोर याने परमात्म्याने आपल्याकडून हे करवून घेतल्याची प्रतिक्रिया मीडियाशी बोलताना दिली होती. या वकिलाचे आरएसएसशी संबंध असल्याचे सांगतिले जात आहे, असेही प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हा वकील अनेकदा आरएसएसच्या शाखांमध्ये सहभागी झाल्याची माहिती मिळत असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

आंबेडकरांच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकांनी वकिलाच्या कृतीचा निषेध केला आहे. मात्र, आंबेडकरांनी पहिल्यांदाच थेट आरएसएसचे नाव घेत वादाला तोंड फोडले आहे. दरम्यान, आंबेडकरांनी बुधवारी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, ही घटना म्हणजे केवळ घटना नसून एक संदेश आहे. पुढचा क्रमांक आता आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांच असू शकतो.

शहरांमध्ये जातीभेदाने मुक-मुखवटा घातलेला आहे. कार्यालये, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांच्या चार भिंतींच्या आत दडलेला आहे. पण आता असे राहिलेले नाही. सरन्यायाधीश गवई यांच्यावर नुकताच झालेला हल्ला हे जातीय घृणा आता चार भिंतींच्या बाहेर आल्याचे कडवट सत्य आहे, अशी नाराजी आंबेडकरांनी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT