Shiv Sena symbol dispute : पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा; कोर्टाने सिब्बलांना थेट CJI गवईंकडे जाण्यास सांगितले...

Supreme Court Directs Kapil Sibal to Approach Chief Justice Bhushan Gavai : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ही याचिका लवकरात लवकर सूचीबध्द करून सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाला केली.
Political Implications of the Shiv Sena Dispute in Maharashtra
Political Implications of the Shiv Sena Dispute in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

MLA Disqualification Raised in Shiv Sena Symbol Hearing : सुप्रीम कोर्टात बुधवारी शिवसेनेच्या पक्ष-चिन्हाची याचिका सुनावणीला आली. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने सहमत दर्शविली असून 12 नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे. आज याचदरम्यान आमदार अपात्रतेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदेंकडेच धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्हही राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाला उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूती उज्ज्वल भुइया आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर आज ही याचिका आली.

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ही याचिका लवकरात लवकर सूचीबध्द करून सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाला केली. हे अत्यावश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जानेवारी महिन्यात नियोजित आहे. त्यामुळे कृपया यावर लवकरात लवकर सुनावणी घ्या, असे सिब्बल कोर्टात म्हणाले.

Political Implications of the Shiv Sena Dispute in Maharashtra
Durga Shakti Nagpal : महिला जिल्हाधिकाऱ्यांना दणका; सरकारी बंगल्यावर कब्जा करणे पडले महागात

सिब्बल यांच्या विनंतीनंतर कोर्टानेही लगेच तयारी दर्शविली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी, आम्ही यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले. कोर्टाच्या या निर्णयानंतर सिब्बल यांनी लगेच आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र घोषित करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात याचिकाही सूचीबध्द करण्याची मागणी सिब्बल कोर्टाला केली.

सिब्बल यांच्या या मागणीवर न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले, ‘अयोग्यतेचे प्रकरण अन्य खंडपीठासमोर सूचीबध्द आहे. दोन्ही प्रकरणे सोबत सूचीबध्द करण्यासाठी तुम्हाला सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल.’ कोर्टाच्या या सुचनेवर सिब्बलही लगेच तयार झाले. त्यामुळे आता सरन्यायाधीशांकडे ठाकरेंकडून दोन्ही प्रकरणे एकाच खंडपीठाकडे सूचीबध्द करण्याची विनंती केली जाणार का आणि त्याला सरन्यायाधीश परवानगी देणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Political Implications of the Shiv Sena Dispute in Maharashtra
Prakash Ambedkar News : CJI गवईंवरील हल्ला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी केलं सावध; म्हणाले, आता पुढचा क्रमांक...

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यामार्फत कऱण्यात आलेल्या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 च्या आदेशाला विरोध केला आहे. निवडणूक आयोगाने संघटनात्मक रचनेमधील पक्षांतर्गत बहुमताबाबत विचार केला नाही. याऐवजी निवडून आलेल्या आमदारांच्या आधारे शिंद गटाच्या ताकदीला महत्व दिले, असे तर्क याचिकेमध्ये देण्यात आला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com