Delhi Police: कॉक्रोज जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दीपके यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप करत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी अन्सारी यांनी केली आहे.
दिल्लीतील पोलिस उपायुक्त (DCP) कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फैजान अन्सारी यांनी सांगितले की, मी आज सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. माझ्याकडे त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर हल्ला केल्याचे पुरावे आहेत. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझ्यावर हल्ले झाले असून, त्या संदर्भात दोन गुन्हे आधीच दाखल आहेत."
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अभिजीत दीपके यांना तातडीने अटक करावी, अशी अन्सारी यांची मागणी आहे. यावेळी त्यांनी दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेचेही कौतुक केले. "सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीतील वातावरण बिघडण्यापासून वाचले. त्याबद्दल मी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांचे अभिनंदन करतो," असेही अन्सारी म्हणाले.
अभिजीत दीपके यांच्यावर टीका करताना अन्सारी यांनी, दीपके हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सर्व काही करत आहेत," असा आरोप केला. दरम्यान, फैजान अन्सारी यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या आरोपांवर अभिजीत दीपके किंवा सीजेपीकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.
दीपके यांच्या समर्थकांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यावर हल्ला केल्याचा अन्सारी यांचा आरोप.
या घटनांप्रकरणी दोन गुन्हे आधीच दाखल असल्याचा दावा.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी.
या आरोपांवर अभिजीत दीपके किंवा सीजेपीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.