Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारी नोकरी! सोलापूर शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांसह 6 जण अटकेत

Solapur Fake Disability Certificate News: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात दोन लिपिकांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट आधारकार्ड व खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे.
Solapur Fake Disability Certificate News:
Solapur Fake Disability Certificate News:Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४५ टक्के अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई करत शासकीय रुग्णालयातील दोन लिपिकांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांमधील दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानंतर शहर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत मोठी कारवाई केली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र

प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट पत्त्याचे पुरावे आणि खोटे आधारकार्ड तयार करून ४५ टक्के अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रमाणपत्रांचा वापर शासकीय नोकरी, आरक्षण तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Solapur Fake Disability Certificate News:
TET News: TET-CTET पात्र शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारने सुधारित नियमावली केली लागू

सहा जणांना अटक

या प्रकरणात पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे.

  1. विजय बाळासाहेब गर्जे- शिक्षक, अहमदनगर

  2. राजेश भाऊसाहेब जाधव, कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे विभाग

  3. महेश दिनकर बारगजे

  4. रमेश रमाकांत ढवण

  5. सागर राजपूत -वरिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय, सोलापूर

  6. वसीम खान-कनिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय, सोलापूर

यातील शासकीय रुग्णालयातील दोन्ही लिपिकांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

तक्रारीनंतर सुरू झाला तपास

दिव्यांग संघटनेने संशय व्यक्त करत तक्रार केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली. समितीच्या अहवालात अनियमितता आढळल्यानंतर पोलिसांकडे अधिकृत फिर्याद देण्यात आली.

Solapur Fake Disability Certificate News:
Abhijit Dipke: ईडी, सीबीआय पाठवत असाल तर मोदींची डिग्रीही पाठवा! अभिजीत दीपकेंचे खुले आव्हान

गुन्हे शाखेची मोठी कारवाई

फिर्याद दाखल झाल्यानंतर सोलापूर शहर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्रे तयार केल्याचे प्राथमिक पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

आणखी धागेदोरे तपासणार

सोलापूर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, संगणकीय नोंदी आणि प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असून, या रॅकेटमधून आणखी किती जणांनी लाभ घेतला आहे, याचा शोध घेतला जात आहे. तसेच इतर शासकीय कार्यालयांशी या प्रकरणाचे काही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

थोडक्यात

  • सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस

  • शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांसह सहा जणांना अटक

  • बनावट पत्ता व खोट्या आधारकार्डाच्या आधारे ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप

  • अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल

  • दिव्यांग संघटनेच्या तक्रारीनंतर तीन सदस्यीय समितीच्या चौकशीत अनियमितता उघड; शहर गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com