Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti allies reaction : CJP च्या आंदोलनाचा गेम भाजपच्या अंगाशी? एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचा सेफ गेम; 'या कारणामुळे महायुतीत अंतर्गत ठिणगी?

CJP movement News : CJP च्या या आंदोलनमुळे बॅकफूटवर आलेल्या भाजपपासून महायुतीमधील मित्रपक्ष अंतर ठेवून आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : नीट पेपर फुटीमुळे आक्रमक झालेल्या युवकांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली एकेक महिन्यापेक्षा अधिककाळ जंतर मंतर मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. CJP च्या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षाने पाठींबा जाहीर केल्याने भाजपची मोठी कोंडी झाली होती. त्यातच आंदोलन हाताबाहेर जात असल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा दिला. दुसरीकडे या आंदोलनमुळे बॅकफूटवर आलेल्या भाजपपासून महायुतीमधील मित्रपक्ष अंतर ठेवून आहेत. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षात अंतर्गत ठिणगी? पडल्याची चर्चा रंगली असतानाच त्याचे मोठे कारण समोर आले आहे.

देशभरात CJP च्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. सुरुवातीला काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या भाजपला या आंदोलनापुढे झुकावे लागले आहे. या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका होत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण वादात महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पावर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजप एकाकी पडल्याचे चित्र आहे. आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना महायुतीमधील या दोन्ही मित्रपक्षाने कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.

महायुतीतीमधील या दोन्ही पक्षाने भाजपसोबत अंतर ठेवण्याचे कारणही समोर आले आहे. या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधातील रोषाचा फटका आपल्यालाही बसू शकतो, अशी भीती महायुतीतील मित्रपक्षांना होती. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीबाबत, तसेच कोंडी फोडण्यासाठी मित्रपक्षांशी कोणतीही चर्चा का केली नाही. त्याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी नाराजी व्यक्त केली.

या प्रश्नावर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतृत्वच अंतिम तोडगा काढणार आहे, अशी सावध भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार असल्याचे पक्षातील काही नेत्यांनी नमूद केले. तसेच, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर झालेली कथित दडपशाही अस्वीकारार्ह आहे, असल्याचे या दोन्ही पक्षाचे म्हणणे आहे.

विद्यार्थी आणि विरोधकांनी नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिसांची कारवाई हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. या दोन्ही मुद्द्यांवरून केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचा कडाडून विरोध करण्यात आला. भाजप आणि विद्यार्थ्यांमधील या संघर्षात आम्ही का पडावे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईबाबत खेद व्यक्त केला. “जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला पोलिसांचा लाठीमार निश्चितच वेदनादायी होता,” अशी टीका त्यांनी केली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते व मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या घरी भेट दिली आहे. तर विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT