Modi Fadnavis Meeting (1).jpg Sarkarnama
महाराष्ट्र

CM Fadnavis News: राज्यात पावसाचा हाहा:कार,मराठवाड्यावर पुराचं संकट, फडणवीसांची PM मोदींशी तासभर चर्चा,लवकरच मोठा निर्णय

Marathwada Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थितीवर,शेतीचं नुकसान यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर जवळपास तासभर चर्चा झाली.

Deepak Kulkarni

New Delhi News: महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून धुवांधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला बसला. राज्यात पावसामुळे तब्बल 70 लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यानंतर सरकार दरबारी मदतीच्या दृष्टीनं हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नी थेट दिल्ली गाठली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(ता.26) दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थितीवर,शेतीचं नुकसान यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर जवळपास तासभर चर्चा झाली. मुख्यमंत्र्‍यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीची माहिती मोदींना दिली.

या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत नेमकी काय चर्चा झाली यावर भाष्य केलं. ते म्हणाले,माझ्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या सहीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) एक निवेदन दिलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातील पूरस्थितीची कल्पना दिली आहे. कशा पध्दतीचं नुकसान झालं ते सांगितलं.

आम्ही त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा.जेवढी जा्स्त मदत करता येईल तेवढी करावी. पंतप्रधान मोदींनीही त्याला सकारात्मकता दाखवली आहे.लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. तुमचा प्रस्ताव आला की,त्यावर आम्ही तातडीनं कार्यवाही करु असंही मोदींनी सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलं. यावेळी जेवढी जास्तीत मदत करता तेवढी करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिल्याचंही ते म्हणाले.

याव्यतिरिक्त पंतप्रधानांकडे महाराष्ट्रच्या संरक्षण कॉरिडॉरसंदर्भातलंही एक प्रेझेंटेशन केलं असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, मराष्ट्रात एक मोठी डिफेन्स मॅन्यफॅक्चरिंगची एक मोठी इकोसिस्टिम तयार होत आहे. ज्याच्यानं डिफेन्स मॅन्यफॅक्चरिंगलाही मोठा बूस्ट मिळेल, आता ज्यामुळे अर्थव्यवस्थेलागही फायदा होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहे,तीन ठिकाणी हा कॉरिडॉर तयार करता येईल हेही आपण त्यांना दाखवलं असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

यातला पहिला भाग पुणे,अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर येथे करु शकू, दुसरा भाग जो आहे तो नाशिक धुळे याठिकाणी तर तिसरा भाग हा नागपूर,वर्धा,यवतमाळ या ठिकाणी करु शकणार आहोत असं पंतप्रधानांना माहिती दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. एकीकडे विरोधकांचा सरकारवरचा ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट कर्जमाफी आणि भरघोस मदतीसाठी दबाव वाढत चालला आहे.

केंद्राकडून भरीव मदत करावी, यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी चिंतेत आहे. सगळं पीक वाहून गेले आहे. मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्यात पूरामुळे घरांचे नुकसान झाले आहे. जनावरे वाहून गेली आहेत. यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती पंतप्रधानांना दिल्यानंतर आता राज्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT